ETV Bharat / state

मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडू नका, अन्यथा कारवाई - तुकाराम मुंढे

author img

By

Published : Apr 10, 2020, 10:16 PM IST

अत्यावश्यक काम असेल आणि गेल्याशिवाय पर्यायच नसेल तेव्हा मास्क घालणे अनिवार्य आहे. जे नागरिक मास्क घालणार नाहीत अशांवर कारवाई केली जाणार असल्याचे मुंढे यांनी सांगितले.

Do not leave the house without wearing a mask said tukaram mundhe
मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडू नका,अन्यथा कारवाई होईल - तुकाराम मुंढे

नाशिक - जीवनावश्यक वस्तू तसेच अन्य अत्यावश्यक कामासाठी मास्क वापरूनच घराबाेहर पडावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. नागरिक मास्क न घालता विनाकारण रस्त्यांवर फिरताना दिसतील त्यांच्यावर कारवाई करण्याची सूचनादेखील आयुक्तांनी केली आहे.

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना १०० टक्के लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन केले आहे. केवळ लॉकडाऊनचे पालन केल्यानेच आपण या संक्रमणापासून स्वत:चा बचाव करू शकतो, असे मुंढेंनी सांगितले.

जीवनावश्यक वस्तुंसाठी नागरिकांना घराबाहेर पडावे लागू नये म्हणून प्रशासनाने या वस्तू घरपोच देण्याचा प्रयत्न केला आहे. तथापि, नागरिकांना या वस्तुंसाठी किंवा अन्य अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडायचे झाल्यास त्यांनी मास्क लावूनच बाहेर निघावे. वापरण्यात येणारा मास्क हा विकतच घेतला पाहिजे असे नाही. तर हा मास्क आपल्याला घरच्या घरी देखील सुती कापडापासून तयार करता येईल. सर्वात आधी तर घराबाहेर जाणे टाळले पाहिजे. मात्र, अत्यावश्यक काम असेल आणि गेल्याशिवाय पर्याय नसेल तेव्हा मास्क घालणे अनिवार्य आहे. जे नागरिक मास्क घालणार नाही अशांवर कारवाई केली जाणार असल्याचे मुंढे यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.