ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांच्या शहरात धनगर समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन - अनुसूचित जमातीचे आरक्षण धनगर समाजाला

आरक्षणासह इतर मागण्यांसाठी धनगर समाजातील नागरिकांनी नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन केले.

धनगर समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन
author img

By

Published : Aug 30, 2019, 12:01 AM IST

नागपूर - आरक्षणासह इतर मागण्यांसाठी धनगर समाजातील नागरिकांनी नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दाची आठवण करून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या शहरात हे आंदोलन करण्यात आले.

घटनेप्रमाणे असलेले अनुसूचित जमातीचे आरक्षण धनगर समाजाला देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे अशा प्रकारचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारमधील नेत्यांनी दिला होता. मात्र, राज्यकर्त्यांनी दिलेल्या आश्वासनाची अजूनही पूर्तता झाली नाही. त्यामुळे धनगर समाजात सरकारविरोधी वातावरण निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या ७० वर्षांपासून धनगर आरक्षणाचे घोंगड भिजत आहे. हा प्रश्न तत्काळ सोडवण्याची मानसिकता सरकारची नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. आघाडी आणि युती सरकारच्या काळात धनगर समाजाच्या मतांचा जोगवा मिळवण्यासाठी राजकारण करण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या शहरात धनगर समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन

२०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज बारामती येथे झालेल्या आंदोलनात एकवटला होता. त्यावेळी आजचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. या घटनेला पाच वर्षे होऊनसुद्ध सरकारने दिलेला शब्द पाळला नसल्याने धनगर समाजातील नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी धनगर समाजाच्या मतांना गृहीत धरू नये असा इशारा आंदोलकांनी दिला.

Intro:आरक्षणा सह इतर मागण्यांसाठी धनगर समाजातील नागरिकांनी नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन केले...मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दाची आठवण करून देण्यासाठी धनगर समाजातील नागरिकांनी मुख्यमंत्र्यांच्या शहरात आंदोलन केले Body:घटनेप्रमाणे असलेले अनुसूचित जमातीचे आरक्षण धनगर समाजाला देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे,अश्या प्रकारचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकार मधील नेत्यांनी दिला होता...मात्र राज्यकर्त्यांनी दिलेले आश्वासनाची अजूनही पूर्तता झाली नसल्याने धनगर समाजात सरकार विरोधी वातावरण निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे... गेल्या ७० वर्षांपासून धनगर आरक्षणाचे घोंगड भिजतं आहे... हा प्रश्न तात्काळ सोडवण्याची मानसिकता सरकारची नसल्याने आज धनगर समाजाची स्वतःची फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली आहे..आघाडी आणि युती सरकारच्या काळात धनगर समाजाच्या मतांचा जोगवा मिळवण्यासाठी राजकारण करण्यात आले..
२०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज बारामती येथे झालेल्या आंदोलनात एकवटला होता, त्यावेळी आजचे राज्याचे मुख्यमंत्री यांनी धनगर आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते...या घटनेला पाच वर्षे होऊन सुद्ध सरकारने दिलेला शब्द पाळला नसल्याने धनगर समाजातील नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह शहरात आंदोलन केले...मुख्यमंत्र्यांनी हजार कोटींची भीक दिली असली तरी यावेळी त्यांनी धनगर समाजचे मातांना गृहीत धरू नये असा इशारा आंदोलकांनी दिला आहे...या माध्यमातून सरकारने दिलेल्या आश्वासनाची मुख्यमंत्री यांना आठवण होईल आणि ते हा प्रश्न निकाली काढतील अशी आशा आंदोलकांना आहे

बाईट-कल्याणी वाघमोडे- आंदोलक

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.