नागपूर - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना महाविकासआघाडीचे सरकार ऑटो रिक्षा दिसते. पण, आमचे सरकार हे विमान आहे. शेतकरी, बेरोजगार, असुरक्षित लेकी-बाळींसाठी हे सरकार आम्ही स्थापन केले. राज्यातील शेतकऱ्यांचा तळतळाट लागला म्हणूनच भाजपच्या हातून सर्व काही गेले, अशी घणाघाती टीका धनंजय मुंडे यांनी केली.
देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत असताना ते अभिभाषणाबद्दल बोलत होते की, सत्तेपासून वंचित राहिल्याचे दुःख बोलून दाखवत होते, हेच कळत नव्हते. फडणवीस म्हणाले बाळासाहेब ठाकरेंप्रती त्यांना आदर आहे. आदर होता तर उद्धव ठाकरेंना दिलेला शब्द का नाही पाळला? असेही मुंडे म्हणाले.
-
आज भाजपला वाटतंय की काहीतरी होईल आणि आम्ही पुन्हा येऊ.महाआघाडीचं सरकार पडावं यासाठी अनेक जण देव पाण्यात ठेवून बसले आहेत.उम्मीद पे दुनिया कायम है| उम्मीद रखो लेकीन आनेवाले १५ साल तक| कारण महाविकास आघाडीचेच सरकार स्थापन व्हावे ही महाराष्ट्रातील जनतेची इच्छा होती. #MahaWinterSession pic.twitter.com/VkPNHwM2rO
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 18, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">आज भाजपला वाटतंय की काहीतरी होईल आणि आम्ही पुन्हा येऊ.महाआघाडीचं सरकार पडावं यासाठी अनेक जण देव पाण्यात ठेवून बसले आहेत.उम्मीद पे दुनिया कायम है| उम्मीद रखो लेकीन आनेवाले १५ साल तक| कारण महाविकास आघाडीचेच सरकार स्थापन व्हावे ही महाराष्ट्रातील जनतेची इच्छा होती. #MahaWinterSession pic.twitter.com/VkPNHwM2rO
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 18, 2019आज भाजपला वाटतंय की काहीतरी होईल आणि आम्ही पुन्हा येऊ.महाआघाडीचं सरकार पडावं यासाठी अनेक जण देव पाण्यात ठेवून बसले आहेत.उम्मीद पे दुनिया कायम है| उम्मीद रखो लेकीन आनेवाले १५ साल तक| कारण महाविकास आघाडीचेच सरकार स्थापन व्हावे ही महाराष्ट्रातील जनतेची इच्छा होती. #MahaWinterSession pic.twitter.com/VkPNHwM2rO
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 18, 2019
भाजपने कधीच दिलेले आश्वासन पाळले नाही आणि आमच्या सरकारला शब्द पाळायला सांगत आहेत. ४४, ५४, ५६ अशा आकडेवारीच्या जोरावरही सरकार स्थापन होऊ शकते, असे आपली लोकशाही सांगते. ही देशातली खरी लोकशाही, भाजप लोकशाहीला दाबायला निघाले होते, अशी टीका मुंडे यांनी भाजपवर केली.