नागपूर - आगामी विधानसभेची चाहूल लागली आहे. ही विधानसभा जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर आता भाजपकडून 'मिसेस' फडणवीस प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी नागपूर दक्षिण, पश्चिम विधानसभेचा भाजपकडून प्रचार करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्या आज नागपूरमध्ये बोलत होत्या.
आगामी विधानसभेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यामुळे पक्षांनी प्रचाराची व्यूहरचना आखायला सुरुवात केली आहे. आता भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस याही प्रचारात सहभागी होणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावाला त्यांनी आज भेट अनेक प्रकल्पांचे लोकार्पण केले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. आज फेटरी गावामध्ये पाणी जलशुध्दीकरण केंद्र, सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच ३० कोटी वृक्षारोपण अभियानाअंतर्गत वृक्ष दिंडीही गावात काढण्यात आली. यामध्ये मिसेस फडणवीस आवर्जून उपस्थित राहून त्यांनी वृक्षारोपण केले.