ETV Bharat / state

'लॉकडाऊन हा पर्याय नाही; पण, प्रशासनाला वाटत असेल तर विरोध नाही' - devendra fadnavis on lockdown nagpur news

जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यात इतर जिल्ह्याच्या तुलनेत नागपुरात रुग्णसंख्या अधिक आहे. आता मृत्यूची संख्यासुद्धा वाढत असल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आहे.

devendra fadnavis
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Mar 20, 2021, 1:12 PM IST

Updated : Mar 20, 2021, 1:25 PM IST

नागपूर - लॉकडाऊन हा पर्याय नाही. मात्र, प्रशासनाला असे वाटत असेल, तर आम्ही त्याला टोकाचा विरोध न करता त्याबाबत विचार करू, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपुरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी पालकमंत्री नितीन राऊत यांनी बैठक आयोजित केली आहे. बैठकीआधी फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस माध्यमांशी संवाद साधताना.

कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ -

जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यात इतर जिल्ह्याच्या तुलनेत नागपुरात रुग्णसंख्या अधिक आहे. आता मृत्यूची संख्यासुद्धा वाढत असल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आहे. लॉकडाऊन आणि उपाययोजनांवर चर्चा होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. कोरोनामुळे जे रुग्ण रुग्णालयात आहे त्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. मोठ्या प्रमाणात रुग्ण हे लक्षणविरहित आहे. यात लक्षण नसलेल्यांना विलगीकरणात ठेवण्याचा मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. यासाठी उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत. या परिस्थितीत खाटा उपलब्ध होण्याचा प्रश्न आता उपस्थित होत आहे. यासोबत जे रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे, त्यांच्या बिलाचा प्रश्न पुन्हा नव्याने समोर येत आहे. यासंदर्भात बैठकीत चर्चा होणार आहे. यात प्रशासनाला या संदर्भात पूर्ण सहकार्य करण्याची आमची भूमिका आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा - कोरोना कहर.. खासगी व सरकारी कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती, सरकारचे आदेश

लॉकडाऊन हा पर्याय नाही -

कोरोनाच्या रुग्णसंख्या वाढीसाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही. शेवटी लॉकडाऊन हे त्याकाळात आरोग्य व्यवस्था उभी करण्यासाठी महत्वाचा असते. पण प्रशासनाला असे वाटत असेल की काही पर्याय नाही तर त्यावर चर्चा करू. लॉकडाऊनला आम्ही विरोध करणार नाही. मात्र, त्याच्या कार्यक्षमतेवर विचार झाला पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्रात कोरोना का वाढतोय हा प्रश्नच -

इतर राज्याच्या तुलनेत कोरोना महाराष्ट्रात का वाढत आहे, हे गूढच आहे. अनके राज्यात निवडणुका असताना कोरोना वाढताना दिसत नाही. यामुळे महाराष्ट्रातच कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ का होत आहे? हा प्रश्न आहे. यावर तज्ज्ञ लोकांशी विचार विनिमय करून याची कारणे जाणून घेतले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - नागपुरात लॉकडाऊनच्या पाचव्या दिवशी 3,235 कोरोना बधितांची भर; 35 जणांचा मृत्यू

Last Updated : Mar 20, 2021, 1:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.