ETV Bharat / state

Devendra Fadnavis News: ओबीसीच्या आरक्षणात कुणाची घुसखोरी होऊ देणार नाही- देवेंद्र फडणवीस - Maratha Reservation

Devendra Fadnavis News : ओबीसी समाजावर अन्याय करण्याची आमची भूमिका नाही. समाजाने संभ्रम दूर करावा, असं आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले. ते आज नागपूरमध्ये होत. सर्वांनी मिळून सकारात्मक विचार केल्यानं समाजाचं भलं होईल, असंही ते म्हणाले.

Devendra Fadnavis News
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 11, 2023, 6:15 PM IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

नागपूर : राज्यात ज्यावेळी समाजाचे प्रश्न निर्माण होतात, त्यावेळी ते प्रश्न पक्षीय राजकारणापलीकडचे असतात. त्यामध्ये सरकार किंवा विरोधी पक्ष या सर्वांनी मिळून समाजाच्या हिताचा विचार करायचा असतो. ही जी बैठक आहे, यामध्ये मराठा समाजच्या सर्व मागण्या आणि प्रश्नांचा नीट एकत्रितपणे विचार करायचा असतो. राज्याने यावर राजकारण न होऊ देता समाजाच्या हिताचा निर्णय कसा घेता येईल, याचा प्रयत्न करायचा असतो. तो, केला जाईल अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. ते आज नागपूर येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमानंतर माध्यमांसोबत बोलत होते.

उपोषण मागे घेण्याचं आवाहन : मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः मनोज जरांगे यांच्या सोबत चर्चा केलीय. त्यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलंय. लोकशाहीमध्ये उपोषण महत्वाचं आयुध आहे, त्याला मान्यता आहे असं देखील ते म्हणाले आहेत. कोणताही निर्णय घेताना सरकारला कायद्याचा विचार करावा लागतो. सर्वोच्च न्यायालयांच्या निर्णयाचा विचार देखील करावा लागतो. प्रश्न सोडवायचे असेल, तर ते कायद्याच्या चौकटीवर टिकले देखील पाहिजे. अन्यथा उद्या समाज म्हणेल की, तुम्ही आमची फसवणूक केली. निर्णय घेतांना सर्वांनी मिळून सकारात्मक विचार केला, तर समाजाचे भलं होईल असं मत फडणवीसांनी व्यक्त (Devendra Fadnavis Reaction on Maratha Reservation) केलंय.

कोणावरही अन्याय होणार नाही : ओबीसी समाजावर कसलाही अन्याय होऊ देणार (Devendra Fadnavis on OBC Community) नाही. ओबीसी समाजानं मनात असलेली भीती दूर करावी. ओबीसीच्या आरक्षणात कुणाची घुसखोरी होऊ देणार नाही. दोन समाज एकमेकांच्या समोर यावे, अश्या प्रकारचा निर्णय हा राज्य सरकार होऊ देणार नाही. कुणी तसा प्रयत्न करू नये. इतर समाज देखील आपल्या समाजाचे घटक आहेत. कुठलाही समाज दुखावणार नाही, असा प्रयत्न केला पाहिजे. ओबीसी समाजाला आश्वस्त करतो की, आमच्या सरकारकडून ओबीसी समाजावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, असं फडणविसांनी सांगितलंय.

हेही वाचा :

  1. Devendra Fadnavis On Modi Govt: देवेंद्र फडणवीस यांनी लुटला अमरावतीत दहीहंडीचा आनंद, म्हणाले... मोदींवर प्रेम करणाऱ्या नेत्याला जनता...
  2. Devendra Fadnavis : निवडणूक शपथपत्र प्रकरण; देवेंद्र फडणवीसांची नागपूर न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
  3. Devendra Fadnavis On India Alliance : देश वाचवण्यासाठी नाही तर...देवेंद्र फडणवीसांची इंडिया आघाडीवर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.