ETV Bharat / state

फडणवीसांची नवाब मलिक यांच्या नावावर महायुतीमध्ये घेण्यास फुली; देश महत्त्वाचा म्हणत अजित पवारांना दिलं पत्र

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 7, 2023, 8:04 PM IST

नवाब मलिक यांना अजित पवार गटात सामील करण्यास महायुतीचा विरोध असल्याचं आता समोर आलं आहे. या बाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यंत्री अजित पवारांना पत्र लिहित मलिकांना विरोध दर्शवला आहे. मलिकांवर गंभीर आरोप आहेत. त्यामुळं त्यांना महायुतीत घेणं योग्य ठरणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Devendra Fadnavis Letter To Ajit Pawar
Devendra Fadnavis Letter To Ajit Pawar

नागपूर : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक आज हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं नागपुरात आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी त्यांनी विधानसभेत हजेरी लावली. यावेळी ते सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसले. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, यावरून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपावर जोरदार हल्ला केला. नवाब मलिक यांच्याबाबत भाजपानं आपली भूमिका स्पष्ट करावी, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं होतं. त्यावर फडणवीस यांनी उत्तर देत, आम्ही कोणाच्या मांडीवर बसत नाही. आम्ही फक्त एकनाथ शिंदे, अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसलोय, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.

  • सत्ता येते आणि जाते.
    पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा… pic.twitter.com/WDzm3Pjo3f

    — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 7, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

महायुतीतून मलिकांना विरोध : त्यानंतर नवाब मलिक यांच्यावरून चांगलंच राजकारण तापलं आहे. नवाब मलिक यांचा महायुतीत समावेश करण्यास देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला आहे. तसं पत्र त्यांनी अजित पवार यांना पाठवलं आहे. "सत्ता येते, जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे. सध्या मलिक वैद्यकीय कारणास्तव जामिनावर बाहेर आहेत. जर त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नाहीत, तर आपण त्यांचं स्वागत करावं. मात्र, असे आरोप असताना मलिकांना महायुतीचा भाग बनवणं योग्य होणार नाही", असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात म्हटलंय.

नेमकं काय आहे पत्रात : "माजी मंत्री तथा विधानसभेचे सदस्य नवाब मलिक यांनी आज विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेतला. त्यांना विधानसभेचा सदस्य म्हणून तो अधिकार आहे. मी सुरुवातीलाच स्पष्ट करतो की, आमचे कोणतेही वैयक्तिक वैर नाही. त्यांच्याविरोधात गंभीर आरोप आहेत. त्यामुळं त्यांना महायुतीत समाविष्ट करणं योग्य होणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात म्हटलं आहे.

"सत्ता येते, जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय कारणास्तव जामिनावर बाहेर आहेत. जर त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले, नाहीत तर आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे. मात्र, असे आरोप होत असताना त्यांना महायुतीचा भाग बनवणं योग्य होणार नाही, असं आमचं स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यावे, हा तुमचा अधिकार हक्क आहे. मात्र, महायुतीत अडचण निर्माण होणार नाही, याचा विचार प्रत्येक घटक पक्षानं करायला हवा. त्यामुळं आमचा मलिकांना विरोध आहे, असं फडणवीस यांनी पत्रात स्पष्ट केलं आहे.

“देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक झाली असली, तरी तत्कालीन मुख्यमंत्री, महाविकास आघाडी सरकारनं त्यांना मंत्रीपदी ठेवण्याच्या विचाराशी आम्ही सहमत होऊ शकत नाही. मला आशा आहे की, तुम्ही आमच्या भावनांची दखल घ्याल”, असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात म्हटलं आहे.

हेही वाचा -

  1. “जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, अजित पवार गटाची आव्हाडांवर जहरी टीका
  2. नवाब मलिक अजित पवार गटात! मलिकांची विकासाला साथ
  3. राष्ट्रवादी पक्ष अजित पवार यांचाच, रुपाली चाकणकरांचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.