नागपूर - सावरकरांच्या संदर्भात राहुल गांधी जोपर्यंत माफी मागणार नाहीत, तोपर्यंत सभागृह चालू देणार नसल्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. सावरकर संदर्भातील गौरवोद्गार ज्यावेळी सभागृहाच्या कामकाजातून काढले जात होते, तेव्हा शिवसेना गप्पा बसली होती. यालाच सत्तेची लाचारी म्हणतात, अशी बोचरी टीका फडणवीस यांनी शिवसेनेवर केली.
हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस जोरदार गोंधळाचा ठरला. पहिल्याच दिवशी विरोधकांनी सावकारांच्या मुद्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी यावर चर्चा करण्यासाठी नियम ५७ ची नोटीस दिली होती. त्यानुसार झालेल्या चर्चेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भात गौरवात काही शब्द काढले. मात्र, ते सभागृहाच्या कामकाजातून वगळण्यात आल्याची दुर्दैवी घटना घडली असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
हेही वाचा - हिवाळी अधिवेशन : विधानपरिषदेचे कामकाज सुरू
हे सर्व घडत असताना शिवसेना नेते आमदार आणि मुख्यमंत्री गप्प बसले होते. सावरकरांचे उग्दार कामकाजातून काढू नका, असे सुद्धा बोलण्याची हिम्मत शिवसेना दाखवू शकली नाही, असा आरोप फडणवीस यांनी केला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर बोलू दिले नाही तर, आम्ही आक्रमक भूमिका घेऊ. हक्कभंग आणला तरी चालेल पण, राहुल गांधी जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही, अशी भूमिका विरोधीपक्षांनी घेतली आहे.
हेही वाचा - 'बलात्कार प्रकरणांमध्ये आंध्रप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कठोर कायदा करा'