ETV Bharat / state

नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट - Nagpur Corona Hospital

नागपूर जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी आहे. मागील काही दिवसांत जवळपास ३१ हजारांच्या घरात रुग्ण कोरोमुक्त झाले आहेत.

नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

author img

By

Published : May 12, 2021, 4:26 PM IST

नागपूर - नागपूर जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी आहे. जिल्ह्यात सातत्याने कोरोना रुग्णसंख्या घटताना दिसून येत आहे. यामध्ये कोरोनाबाधित रुग्णाची संख्या घसरली असून दररोज मिळणाऱ्या रुग्णसंख्येत जवळपास ६० टक्क्याने घसरण झाली आहे. यात मंगळवारी २२४३ बाधितांची नोंद झाली. सध्या एकूण बाधितांची संख्याही ४६ हजारच्या इतकी आहे.

मंगळवारी आलेल्या अहवालात मागील २४ तासात १४ हजार ४६४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये २२४३ कोरोना बधितांची भर पडली आहे. यात बाधितांच्या तुलनेत कमालीची घट झाली असून ७ हजाराची घट होऊन आता रुग्णसंख्या २ आसपास आली आहे. मागील १० ते १२ दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या हळूहळू कमी होऊन कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. यामध्ये शहरी भागात ३२, ग्रामीण भागात १९ तर जिल्ह्याबाहेरील १४ जण हे कोरोनामुळे दगावले आहेत. तसेच ६ हजार ७२५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सक्रिय रुग्णसंख्या ४६ हजार ५९६वर पोहोचली आहे. यामुळे मागील काही दिवसात जवळपास ३१ हजारांच्या घरात रुग्ण घटले आहे.

पूर्व विदर्भात ९ हजार ६०५ जण कोरोनामुक्त

रविवारी आलेल्या अहवालात पूर्व विदर्भात ९ हजार ६०५ जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. यात ५ हजार ३७ नव्याने कोरोना बाधितांची भर पडली आले. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यातील १०४ जण कोरोनाने दगावले असून यात ४५६८ जण रुग्ण कोरोमुक्त झाले आहेत. यात मागील काही दिवसांत घट होताना चंद्रपूर गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यात अजूनही बधितांची संख्या सरासरीत ५००पेक्षा अधिक आहे.

हेही वाचा - आरपीएफ जवानाची सतर्कता; धावत्या रेल्वेतून फलाटाच्या गॅपमध्ये जाणाऱ्या महिलेचे वाचविले प्राण

हेही वाचा - बार-हॉटेल मालकांप्रमाणे शेतकरी, कष्टकऱ्यांचीही दखल घ्या; रक्षा खडसेंचे शरद पवारांना पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.