ETV Bharat / state

DCM Devendra Fadnvis on OBC Reservation : ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही; आरक्षणावरुन देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

DCM Devendra Fadnvis on OBC Reservation : सध्या राज्यात आरक्षणावरुन राजकीय वातावरण तापलंय. मराठा समाजानंतर आता ओबीसी समाजानंही मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात येऊ नये यासाठी नागपूर आणि चंद्रपूरात उपोषण सुरू केलंय. या उपोषणकर्त्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भेट घेत ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नसल्याचं स्पष्ट केलंय.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
DCM Devendra Fadnvis on OBC Reservation
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 16, 2023, 7:33 PM IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर DCM Devendra Fadnvis on OBC Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी जालन्यातील आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटीलांनी अनेक दिवस उपोषण केलं. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत त्यांनी उपोषण मागं घेतलंय. मात्र, नागपूर आणि चंद्रपुरात मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात येऊ नये या मागणीसाठी कुणबी समाजाचे प्रतिनिधी उपोषणाला बसले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या उपोषणकर्त्यानां उपोषण सोडण्याचं आवाहन केलंय. यावेळी त्यांनी उपोषणस्थळी जाऊन उपोषणकर्त्यांची भेटही घेतली.

ओबीसी आरक्षणात कोणालाही वाटेकरी होऊ देणार नाही : नागपूर विमानतळावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारची भूमिका अगदी स्पष्ट आहे. ओबीसी आरक्षणाला कुठेही आम्ही धक्का लागू देणार नाही, कुठेही ते कमी देखील होऊ देणार नाही. तसंच कोणाला नव्याने त्यात वाटेकरी होऊ देणार नसल्याचंही त्यांनी सांगितलंय. ओबीसी समाज बांधवांना आमची विनंती आहे की, त्यांनी जे आंदोलन सुरू केलंय, ते मागं घ्यावं. कुठल्याही प्रकारचं आंदोलन करु नये. संभाजीनगरातही जे आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलकांनाही मी स्वतः विनंती केलीय. माझा विश्वास आहे की, ते उपोषण संपवतील. यामुळे नागपूर व चंद्रपूर येथील आंदोलकांना आमची विनंती आहे की त्यांनीही उपोषणाची सांगता करावी. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपूरच्या आंदोलकांची भेट घेत त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केलीय.

मराठानंतर ओबीसींचेही आंदोलन : जालन्यातील अंतरवली सराटीत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केलं होतं. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेट दिल्यावर त्यांनी उपोषण मागं घेतलंय. मात्र यावेळी कुणबी-मराठा, मराठा-कुणबी असं प्रमाणपत्र देण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलंय. मात्र अद्यापही जरांगे पाटलांचं आंदोलन अद्यापही सुरुच असून उपोषण मागं घेतलं असलं तरी आंदोलन मागं घेणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मराठा आरक्षण देण्याचं आश्वासन त्यांना दिल्यावर ओबीसी समाजानंही आंदोलन सुरू केलंय. ओबीसी समाजाच्या आरक्षणातून स्वतंत्र आरक्षण दिलं तर आम्ही सहन करणार नाही. नेमकं काय सांगून उपोषण मागं घेण्यात आलं हे आम्हाला माहीत नाही असंही या आंदोलनकर्त्यांनी म्हटलंय. यावर ओबीसी आरक्षणात कुठलाही वाटेकरी नसेल, तसंच ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नसल्याचंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय.

हेही वाचा :

  1. Legal expert opinion On Maratha Reservation: मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबीचे दाखले मिळू शकतात का? जाणून घ्या कायदेतज्ज्ञांच मत
  2. Maratha Reservation : ...तर दुसरं मणिपूर महाराष्ट्रात होईल, सरकारनं योग्य भूमिका घ्यावी ; ओबीसी जनमोर्चाचा इशारा
  3. OBC leaders on Maratha quota : मराठा ओबीसी आरक्षणाबाबत ओबीसी नेत्यांची काय आहे भूमिका? जाणून घ्या सविस्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.