ETV Bharat / state

Devendra Fadnavis : अनाथाश्रम चालवणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकाला अनुदानासाठी मागितली लाच, देवेंद्र फडणवीसांची चौकशीची घोषणा - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग येथे लातूर भूकंपातील अनाथ मुलांसाठी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक पन्नालाल सुराणा ( Freedom Fighter Pannalal Surana ) हे अनाथालय चालवतात. मात्र त्यांच्या संस्थेला अनुदान देण्यासाठी महिला आणि बालकल्याण विभागातील अधिकाऱ्याने लाच मागितल्याचा मुद्दा अजित पवार ( Opposition Leader Ajit Pawar ) यांनी आज सदनात मांडला. त्यावर संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadnavis Announced Officers Inquiry ) यांनी केली.

DCM Devendra Fadnavis
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Dec 30, 2022, 5:34 PM IST

नागपूर - पन्नालाल सुराणा यांच्यासारख्या ( Freedom Fighter Pannalal Surana ) स्वातंत्र्य सैनिकाला अनाथाश्रम चालवताना अनुदानासाठी लाच मागितल्याचा प्रकार विरोधी पक्षनेते अजित पवार ( Opposition Leader Ajit Pawar ) यांनी आज सदनात मांडला. त्यावर पन्नालाल सुराणा यांच्यासारख्या स्वातंत्र्य सैनिकाला जर कुणी अनुदानासाठी लाच मागत असेल, तर अशा महिला आणि बालविकास अधिकाऱ्याची चौकशी करून प्रसंगी बडतर्फ करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadnavis Announced Officers Inquiry ) यांनी केली.

सदनात अधिकाऱ्याने लाच मागितल्याचा मुद्दा मांडताना अजित पवार

आपले घर या अनाथालयाला अनुदान देण्यात टाळाटाळ उच्च न्यायालयाकडून अनुदानाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना असतानाही ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि राष्ट्रसेवा दलाचे नेते पन्नालाल सुराणा यांच्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील आपले घर या अनाथालयाला अनुदान देण्यात टाळाटाळ करण्यात येत असल्याची माहिती देत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महिला व बालकल्याण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली.

लातूर भूकंपातील अनाथांसाठी अनाथालय विधानसभेत स्थगन प्रस्तावाद्वारे मुद्दा उपस्थित करताना अजित पवार ( Opposition Leader Ajit pawar ) म्हणाले की, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी राष्ट्रसेवा दलाचे नेते पन्नालाल सुराणा यांचे नळदुर्ग येथे आपले घर हे अनाथालय चालवत आहेत. 30 ऑक्टोबर 1993 रोजी लातूर व उस्मानाबाद (धाराशिव) येथे झालेल्या भुकंपामध्ये मृत्यू पावलेल्या पालकांच्या अनाथ मुलांसाठी हे अनाथालय त्यांनी सुरु केले होते. या अनाथाश्रमाच्या अनुदानाचा प्रश्न मार्गी लावण्याचे उच्च न्यायालयाच्या सूचना आहेत. पहिल्या वर्षी 250-300 मुले असणाऱ्या या अनाथालयात मुलांची संख्या वाढत असून 2000 पासून या संस्थेला शासकीय अनुदान सुरु झाले आहे. 2013-14 व 2014-15 चे 25 लाख 12 हजार अनुदान प्रलंबित राहिल्याने संस्थेने औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात दाद मागितली.

महिला बालविकास अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ उच्च न्यायालयाने सदर अनुदानाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतरही महिला व बालकल्याण विभागाने त्या प्रकरणात काही त्रुटी काढणे, एका किराणा बिलात घोळ आहे, व ट्रस्टचे आधार कार्ड नाही अशा वेगवेगळ्या कारणांची त्रुटी काढून वेळोवेळी अनुदान नाकरले आहे. या प्रलंबित अनुदानातील त्रुटीच्या पुर्ततेसाठी सुराणा ( Freedom Fighter Pannalal Surana ) वैयक्तिकरित्या पुणे येथील महिला व बाल कल्याण विभागाच्या कार्यालयात गेले असता, संबंधित अधिकाऱ्याने त्रुटीसंदर्भात उडवाउडवीची उत्तरे दिली. काळ बदललेला आहे तुम्हीही बदला, तरच कामे होतील, असे सांगून वेगळ्या प्रकारे लाचेची मागणी केली. राज्यातील अनेक अनाथाश्रमाचे अनुदान रोखण्यात ( DCM Devendra Fadnavis Announced Officers Inquiry) येत असून लाच दिल्याशिवाय अनुदान वितरीत केले जात नाही. ही वस्तुस्थिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडली. तसेच महिला व बालकल्याण विभागातील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केली.

चौकशी करून बडतर्फ करणार विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलेला मुद्दा गंभीर असून एखाद्या स्वातंत्र्यसैनिकाला असा अनुभव येत असेल तर ते योग्य नाही. या प्रकरणाची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.