ETV Bharat / state

नागपुरात जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल रेस; जाणून घ्या का साजरा करतात 'हा' दिवस - ३ जून

जागतिक सायकल दिनानिमित्त नागपूर शहरात सायकल रेसचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांमध्ये सायकलिंगचा प्रचार-प्रसार करणे, त्याच बरोबर सायकलचा वापर करून पर्यावरण रक्षण करण्याच्या हेतूने सर्वांनी सायकलचा वापर करावे, असे आवाहन सायकल प्रेमींनी नागपूरकरांना केले.

नागपुरात जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल रेस
author img

By

Published : Jun 3, 2019, 5:14 PM IST

नागपूर - आज संपूर्ण जगात जागतिक सायकल दिन साजरा होत आहे. यानिमित्त आज सकाळी शहरात सायकल रेसचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील लॉ कॉलेज चौकातून या सायकल रेसची सुरुवात करण्यात आली. यामध्ये शहरातील बहुसंख्य सायकल प्रेमी सहभागी झाले होते. या माध्यमातून सायकलस्वारांनी नागपुरातील विविध भागातून पुढे जात नागरिकांना सायकल चालवा, आरोग्य उत्तम ठेवा असा संदेश दिला.

सायकलिंग बद्दल जनजागृती करतांना डॉ. अमित समर्थ

याशिवाय नागरिकांमध्ये सायकलिंगचा प्रचार-प्रसार करणे. त्याच बरोबर सायकलचा वापर करून पर्यावरण रक्षण करण्याच्या हेतूने सर्वांनी सायकलचा वापर करावे, असे आवाहनही सायकल प्रेमींनी नागपूरकरांना केले. जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून सर्वांनी आजपासूनच सायकलचा वापर करावा, असा संदेश यावेळी देण्यात आला. शहरातील सुज्ञ नागरिकांनी केलेल्या जनजागृतीमूळे गेल्या काही काळात सायकल चालवणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे सकारात्मक चित्र बघायला मिळत आहे.

काय आहे जागतिक सायकल दिन -

जगभर ३ जून हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणून साजरा केला जातो. एप्रिल २०१८ मध्ये युनायटेड नेशन्सच्या जनरल असेम्ब्लीने ३ जून हा जागतिक सायकल दिन म्हणून घोषित केला. जवळपास दोन शतकांपासून आपण सायकलीचा वाहतुकीसाठी वापर करत आहोत. सायकलीच्या वापराबाबत जनजागृती निर्माण होण्यासाठी सायकल दिन साजरा केला जातो. हल्ली थोड्या अंतराच्या प्रवासासाठीही दुचाकी आणि चारचाकींचा सर्रास वापर केला जातो. त्यामुळे प्रदूषण, तापमान वाढीचे प्रमाण वाढले आहे. प्रदूषण रोखण्यासोबतच शारीरिक आरोग्यासाठीही सायकल चालविणे उत्तम व्यायाम ठरतो. त्यामुळे प्रत्येकाने आठवड्यातून किमान एक दिवस तरी सायकल चालविण्याचा निर्धार करावा.

Intro:आज संपूर्ण जगात जागतिक सायकल दिन साजरा होत असून या जागतिक सायकल दिनानिमित्त आज सकाळी नागपुरात सायकल रेस चे आयोजन करण्यात आले होते...या रेस मध्ये शहरातील बहुसंख्य सायकल प्रेमी सहभागी झाले होतेBody:नागपुरातील लॉ कॉलेज चौक येथून सुरू करण्यात आली,त्यानंतर ही सायकल रेसच्या माध्यमातून सायकल स्वारांनी नागपुरातील विविध भागातून पुढे जात नागरिकांना सायकल चालवा ,आरोग्य उत्तम ठेवा असा संदेश देत दिला... याशिवाय नागरिकांमध्ये सायकलिंगचा प्रचार-प्रसार करण्याचा हेतूने आणि सायकल चा वापर करून पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी सायकल चा वापर करावा असे आवाहनही सायकल प्रेमीं नागरिकांना करत असल्याचे दिसत होते.. जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून सर्वांनी आजपासूनच सायकल चा वापर करावा असे आवाहन नागपुरातील सायकल प्रेमींनी यावेळी केले...गेल्या काही काळात सायकल चालवणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे सकारात्मक चित्र बघायला मिळत आहे

Byte-डॉ. अमित समर्थ, सायकल प्रेमी, नागपूर
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.