ETV Bharat / state

पेट्रोल पंपावरील महिला कर्मचाऱ्याला ग्राहकाकडून मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद - नागपूर लेटेस्ट न्युज

नागपुरातील यशोधरा नगरातील पेट्रोल पंपावर महिलेला मारहाण झाल्याची घटना घडली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

woman beaten on petrol pump story  nagpur crime news  nagpur latest news  नागपूर लेटेस्ट न्युज  पेट्रोल पंपावर महिलेला माराहण
पेट्रोल पंपावरील महिला कर्मचाऱ्याला ग्राहकाकडून मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद
author img

By

Published : Apr 19, 2020, 8:29 PM IST

Updated : Apr 19, 2020, 8:38 PM IST

नागपूर - शहरातील यशोधरा नगर परिसरातील पेट्रोल पंपावर एका अज्ञाताने महिला कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची केल्याची घटना घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून यशोधरा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पेट्रोल पंपावरील महिला कर्मचाऱ्याला ग्राहकाकडून मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

लॉकडाऊनच्या काळात गरजेच्या वस्तू विकत घेण्यासाठी सकाळच्या सुमारास नागरिक बाहेर पडत आहेत. याचवेळी नागरिक पेट्रोल पंपावर गर्दी करताना दिसत आहेत. आज शहरातील यशोधरा नगर परिसरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला आलेल्या अज्ञाताला महिला कर्मचाऱ्याने पैसे मागितले. त्यावेळी तो संतप्त झाला. त्यांच्यात बाचाबाची झाली आणि त्याने महिलेला मारहाण करायला सुरुवात केली. तेवढ्यात इतर कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. मात्र, आरोपी पळून गेला. याप्रकरणी यशोधरा नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने आरोपीचा शोध घेत आहेत.

Last Updated : Apr 19, 2020, 8:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.