नागपूर - आजपासून संचारबंदीत प्रशासनाने सूट दिल्याने शहरातील आस्थापनांसह कामगारही कामावर परतले आहेत. त्यामुळे कामगार वर्गात उत्साह संचारला आहे. आठ दिवसानंतर कामावर परतलेल्या कामगारांनी सरकारने काहीही झाले तरी पुन्हा लॉकडाऊन सारखे आत्मघातकी निर्णय घेऊ, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना प्रशासनाने १५ ते २१ मार्च दरम्यान संचारबंदीची अंमलबजावणी केल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी आहे.
गेले संपूर्ण वर्षभर कोरोनामुळे शहरात आणि जिल्ह्यात संचारबंदी सदृश्य परिस्थिती होती. त्यामुळे हजारोंच्या संख्येने नागपुरातील कामगार हे आपआपल्या गावी परत निघून गेले होते. नव्या वर्षात लॉकडाऊनच्या नियमात शिथिलता आलीमुळे कामगार पुन्हा नागपुरला परतले. जनजीवन सुरळीत होत असतानाच पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे. त्यामुळे प्रशासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतल्याने गेल्यावर्षी ओढवलेल्या भीषण परिस्थितीची आठवण झाल्याची कबुली अनेक कामगारांनी दिली आहे.
हेही वाचा - राज्यात अवकाळी पावसाचा कहर; शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान
पुन्हा लॉकडाऊन नको -
गेल्यावर्षी कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन लावण्यात आला होता. यावर्षीही मार्च महिन्यातच नागपुरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. यामध्ये गरीब आणि मध्यम वर्गावर उपासमारीची वेळ येईल, अशी भीती व्यक्त केली जात असताना प्रशासनाने लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये शिथिलता आणून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कामगार या धास्तीतुन बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे. प्रशासनाने यापुढे कितीही बिकिट परिस्थिती निर्माण झाली तरी लॉकडाऊन सारखा आत्मघातकी निर्णय घेऊ नये, अशी अपेक्षा कामगारांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस अन् गारपीट सुरू; 4 हजार 880 हेक्टरवरील पिकांचे नुकसान