ETV Bharat / state

कोरोना संकटात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांसाठी खास 'फिव्हर क्लिनिक'ची सुरुवात - नागपूर कोरोना अपडेट

नागपूरमध्ये कर्तव्य बजावत असताना, मागील आठ दिवसांमध्ये 3 पोलीस कर्मचाऱ्यांसह 5 एसआरपीएफच्या जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे नागपूर पोलीस आयुक्तांनी, खास पोलिसांसाठी फिव्हर क्लिनिक सुरू केले आहे.

COVID-19: In a first, Nagpur police kick starts 'Fever clinic' for it's force
कोरोना संकटात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांसाठी खास 'फिव्हर क्लिनिक'ची सुरूवात
author img

By

Published : May 23, 2020, 1:31 PM IST

नागपूर - मागील काही दिवसांपासून पोलीस विभागात कोरोनाची लागण झाल्याची अनेक प्रकरण समोर आली. यात दिवसागणिक वाढ होताना पाहायला मिळत आहे. यामुळे खास पोलिसांसाठी 'फिव्हर क्लिनिक' सुरू करण्यात आले आहे. या क्लिनिकमध्ये प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नागरिकांना रस्त्यांवर गर्दी करण्यास रोखण्यासाठी, पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे. महत्वाचे म्हणजे, कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या कंटेन्मेंट झोनमध्ये देखील पोलीस तैनात आहेत. नागपूरमध्ये कर्तव्य बजावत असताना, मागील आठ दिवसांमध्ये 3 पोलीस कर्मचाऱ्यांसह 5 एसआरपीएफच्या जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे नागपूर पोलीस आयुक्तांनी, खास पोलिसांसाठी फिव्हर क्लिनिक सुरू केले आहे.

पोलिसांसाठी फिव्हर क्लिनिक विषयी माहिती देताना पोलीस निरीक्षक भीमराव खंडाळे...

नागपूरच्या प्रत्येक चौकात आणि प्रतिबंधित भागात पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत. यात चौकशीसाठी त्यांचा काहीसा संबंध नागरिकांशी येतो. यामुळे अनेक पोलिसांच्या मनात कोरोनाच्या भीतीने घर केले आहे. पोलिसांच्या मनातील ही भीती दूर व्हावी, या उद्देशाने फिव्हर क्लिनिक सुरू करण्यात आले आहे.

याच्या माध्यमातून नागपुरातील 32 पोलीस स्टेशनमधील प्रत्येक कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. तसेच हॉट स्पॉट भागातील बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी प्रामुख्याने केली जात आहे. नागपूर शहरात एकूण 8 हजार 500 कर्मचारी आहेत. त्यापैकी सोळाशे कर्मचाऱ्यांची तपासणी आतापर्यंत करण्यात आली आहे.

हेही वाचा - महाराष्ट्र बचाव आंदोलन : नागपुरातही भाजपकडून शासनाचा निषेध

हेही वाचा - शिक्षण विभागात निर्णय क्षमता नसल्याचा आरोप करत भाजपच्या शिक्षक आघाडीकडून निषेध

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.