नागपूर District Central Bank Shares Scam : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 125 कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. या खटल्याचा महत्वपूर्ण निकाल न्यायालयानं पुढे ढकलला आहे. 125 कोटी रुपयांच्या शेअर्स घोटाळा प्रकरणात माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार सुनील केदार आरोपी आहेत. 2001-2002 च्या बँकेच्या या घोटाळ्याच्या वेळी सुनील केदार बँकेचे अध्यक्ष होते. त्यांच्या काळात हा घोटाळा झाला होता.
काय आहे प्रकरण : 2001-2002 साली नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी मंत्री सुनील केदार होते. तेव्हा होमट्रेड लिमिटेड मुंबई, इंद्रमनी मर्चंट्स प्रायव्हेट लिमिटेड कोलकाता, सेंचुरी डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड कोलकाता, सिंडिकेट मॅनेजमेंट सर्विसेस अहमदाबाद, गिलटेज मॅनेजमेंट सर्विसेस मुंबई यांच्याकडून बँकेच्या रकमेतून सरकारी रोखे (शेयर्स) खरेदी करण्यात आले होते. त्यानंतर शेअर्स खरेदी करणारी खासगी कंपनी दिवाळखोर निघाली होती. त्यानंतर कंपन्यांनी सरकारी शेअर्स दिले नव्हते. तसंच त्यांनी बँकेची रक्कमही परत केली नाही, असा आरोप करण्यात आला आहे. सहकार विभागाच्या कायद्यातील नियम, तरतुदींचं उल्लंघन करत ही रक्कम गुंतवण्यात आली होती. या कंपन्या बुडाल्यानं शेतकऱ्यांचे पैसेही बुडाले होते. त्यामुळं सुनील केदार तसंच अन्य काही जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले होते.
11 आरोपींपैकी 9 आरोपींवर गुन्हे दाखल : पुढं या प्रकरणाचा तपास राज्य सीआयडीकडं देण्यात आला होता. तपास पूर्ण झाल्यावर 22 नोव्हेंबर 2002 रोजी सीआयडीनं न्यायालयात आरोप पत्र दाखल केलं होतं. तेव्हापासून हा खटला विविध कारणांनी प्रलंबित आहे. खटल्यात एकूण 11 आरोपींपैकी 9 आरोपींवर विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भादंविच्या 406 (विश्वासघात), 409 (शासकीय नोकर आदीद्वारे विश्वासघात) 468 (बनावट दस्तावेज तयार करणे), 120-ब (कट रचणे) असे दोषारोप निश्चित करून खटला चालविण्यात आला. आता या प्रकरणाचा निकाल १८ डिसेंबरला लागणार आहे, असं आज कोर्टानं स्पष्ट केलं.
हेही वाचा -