नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशात 21 दिवसांचा 'लॉक डाऊन' जाहीर केला आहे. या काळात सर्व जीवनावश्यक सेवा पूर्वीप्रमाणे सुरळीत सुरू राहणार आहेत. त्यामुळे सध्या राज्यात सुरू असलेल्या लॉक डाऊनच्या कालावधीत फक्त वाढ झाली असल्याचे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
जनता कर्फ्यूच्या काळात तसेच राज्यात लागू असलेल्या कलम 144 च्या अधिसूचनेत नमूद केलेल्या बाबी तशाच सुरू राहणार आहेत. 21 दिवसाच्या 'लॉक डाऊन'च्या घोषणेमुळे जीवनावश्यक बाबींच्या पुरवठ्यासह जीवनावश्यक सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही, याची प्रशासन काळजी घेत आहे. त्यामुळे विनाकारण दुकानात गर्दी करू नका, असे आवाहन पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
हेही वाचा - Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोंदियामध्ये 'फिव्हर ओपीडी'
हेही वाचा - Coronavirus : कृपया घरीच थांबा, अशोक चव्हाणांनी शेअर केला व्हिडिओ