ETV Bharat / state

CORONA VACCINATION : नागपुरात 2 ते 6 वयोगटातील मुलांवर ट्रायल सुरू; 10 मुलांना दिला पहिला डोस

यापूर्वी पहिल्या टप्प्यात 12 ते 18 वयोगटानंतर दुसऱ्या टप्प्यात 6 ते 12 या वयोगटात तर आता तिसऱ्या टप्प्यात 2 ते 6 वयोगटातील स्वयंसेवी मुलांना ही लस देण्यात आली आहे. या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी 22 लहान मुलांचे स्क्रिनिंग करण्यात आले. यामध्ये 14 मुलांची निवड केली जाणार आहे.

corona vaccination
नागपुरात 2 ते 6 वयोगटातील मुलांवर ट्रायल सुरू; 10 मुलांना दिला पहिला डोस
author img

By

Published : Jul 3, 2021, 6:56 AM IST

Updated : Jul 3, 2021, 8:34 AM IST

नागपूर - भारत बायोटेककडून कोरोना लसीकरणाच्या सुरू असलेल्या लहान मुलांच्या मानवी चाचणीच्या तिसरा टप्प्याला सुरुवात झाली. यात 2 वर्ष ते 6 वर्ष या वयोगटात 14 मुलांना ही लस दिली जाणार आहे. शुक्रवारी 10 लहान मुलांना लस देण्यात आली. उर्वरीत चार जणांना ट्रायल लसीचा पहिला डोज नंतर दिला जाणार आहे. नागपूरच्या मेडिट्रीना रुग्णालयात लसीचा पहिला डोस देण्यात आला, अशी माहिती चीफ इन्वेस्टिंगेटर डॉ. वसंत खडतर यांनी दिली.

चीफ इन्वेस्टिगेटर डॉ. वसंत खडतकर याबाबत माहिती देताना

2 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना लागण -

यापूर्वी पहिल्या टप्प्यात 12 ते 18 वयोगटानंतर दुसऱ्या टप्प्यात 6 ते 12 या वयोगटात तर आता तिसऱ्या टप्प्यात 2 ते 6 वयोगटातील स्वयंसेवी मुलांना ही लस देण्यात आली आहे. या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी 22 लहान मुलांचे स्क्रिनिंग करण्यात आले. यामध्ये 14 मुलांची निवड केली जाणार आहे. आता सर्व मुलांचे प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये सुदृढ असणाऱ्या बालकांची अँटीबॉडी निगेटिव्ह असणाऱ्या मुलांची लसीच्या ट्रायलसाठी निवड करण्यात आली. यात प्राथमिक माहितीनुसार, तीन ते चार जणांच्या अँटीबॉडीज पॉझिटिव्ह आले असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे 2 ते 6 वर्ष वयोगटात सुद्धा कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा - कोरोनाच्या नवीन व्हेरियंटवर कोव्हॅक्सीन लस प्रभावी; अमेरिकेच्या NIH चा दावा

यात पहिल्या टप्प्यात 6 जूनला जवळपास 50 मुलांना लस देण्यात आली आहे. त्यानंतर दुसरा टप्प्यात 16 जूनला 25 मुलांना लस देण्यात आली. तर तिसऱ्या टप्प्यात शुक्रवारी 2 जुलैला 14 मुलांना लस देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पहिला डोस देण्यात आलेल्याना 28 दिवसांनी लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे. यामुळे या ट्रायलचा फायदा लवकर लहान मुलांसाठी लस उपलब्ध होण्यास होणार आहे.

तिसऱ्या संभाव्या लाटेच्या पार्श्वभूमीवर...

यात लहान मुलांना 0.5 मिलीचे लस देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर त्यांच्यावर लक्ष ठेवून काही लक्षणे किंवा साईड इफेक्ट होते का? याची नोंद घेतली जाणार आहे. यामध्ये पहिल्या दोन टप्प्यात मानवी ट्रायलचे निष्कर्ष हे सकारात्मक आहे. मात्र, लस यशस्वी होण्यासाठी आणखी काही परिक्षणातून जावे लागणार आहे. यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका असतांना लवकरात लवकर लस इतर लहान मुलांसाठी उपलब्ध होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा - DOCTORS DAY : '9 महिने कुटुंबापासून सोशल डिस्टन्स, लिफ्टमधून यायचे जेवणाचे ताट'

Last Updated : Jul 3, 2021, 8:34 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.