नागपूर - लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांना अनेक अडचणींना समोर जावे लागत आहे. यात शहरातील बदमान गली म्हणून ओळख असणालेल्या भागात चित्र विदारक आहे. यात कोणाला संसर्ग होऊ नये म्हणून वारांगना यांचा व्यवसाय बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. परंतु पोटाची खळगी भरायची कशी? हे प्रश्न उभे ठाकले असताना व्यवसाय बंद करणारे पोलीस आणि व्यापारी वर्ग मदतीला धावून आले आहे. दररोज त्यांच्या दोन वेळेच्या अन्नाची सोय करुन वारांगनांना मदतीचा हात दिला जात आहे.
नागपूरच्या लकडगंज परिसरात पहिल्या लाटेत वारांगनांनी आपला व्यवसाय बंद ठेवला. या काळात एकही कोरोनाबाधित रुग्ण या भागात आढळून आला नाही. दुसऱ्या लाटेत उपासमारीने मरण्याची वेळ त्यांच्यावर आली असतांना, लकडगंज पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पराग पोटे यांच्यापुढे काहीनी आपली व्यथा मांडली. यात त्यांना मदत करायची म्हणून व्यापारी वर्गाची मदत घेतली आणि दोन वेळेवच्या जेवणाची सोय करून दिली. या काळाचा कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती असताना देहविक्री करणाऱ्या वारांगना कोण मदत करणार असा प्रश्न पुढे आला होता. पोलिसांच्या या मदतीमुळे वारांगनांना मदतीचा हात मिळाला आहे.
हेही वाचा -उदरनिर्वाहासाठी परमिंदर कौर यांची जिद्द; नऊ वर्षांपासून नांदेडातील रामघाट स्मशानभूमीत वास्तव्य