नागपूर - नागपूर शहरातून खूनाची घटना समोर आली आहे ( murder in Nagpur city ). वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रावण नगर परिसरात एका भावाने दुसऱ्या भावाची हत्या केल्याची घटना घडली ( Brother killing another brother ) आहे. जुगार खेळण्याच्या वादातून हत्येची घटना घडल्याचे समोर आले आहे. चंद्रकांत पौनीकर असे हत्या झालेल्या इसमाचे नावं आहे. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता अशी माहिती पुढे आली आहे तर आरोपी मृतकाचा लहान भाऊ असून रोशन पौनीकर असे त्याचे नावं आहे.
जुगार खेळण्याच्या वादातून हत्या - हत्येची घटना वाठोडा हद्दीतील हजरत बाबा मशिदीजवळ मंगळवारी रात्री उशिरा घडली आहे. रात्री चंद्रकांत पौनीकर हा घरी जुगार खेळत असल्याचे बघून त्याचा लहान भाऊ रोशन संतापला. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाल्यानंतर काही वेळातच वाद विकोपाला गेला. त्यातूनच रोशनने चंद्रकांतला मारहाण केली ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे ( murder over gambling dispute ) .
हत्येच्या घटनांमध्ये वाढ - जुलै महिन्यात एकूण १० हत्येच्या घटना घडल्या ( 10 murders in July ) आहेत. त्यातच आता ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच हत्येची घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
सात महिन्यात ४० हत्या - नागपूर शहरात दरमहिन्यात सरासरी हत्येच्या ५ घटनांची नोंद आहे. त्यातही फेब्रुवारी मध्ये एकही हत्या झाली नाही. मात्र,मार्च महिन्यात सर्व कसर भरून निघाली होती. एकट्या मार्च महिन्यात सर्वाधिक ११ हत्येच्या घटना घडल्या आहेत. जानेवारी महिन्यात ५,फेब्रुवारीमध्ये 0, मार्च महिन्यात ११, एप्रिल महिन्यात ४, मे मध्ये ६, जून महिन्यात ४ तर सुरू असलेल्या जुलै महिन्यात १० हत्येच्या घटनांची नोंद झाली आहे.