ETV Bharat / state

विदर्भात थंडीची तीव्रता घटली; नव्या वर्षात थंडीच्या पुनरागमनाची शक्यता

author img

By

Published : Dec 29, 2020, 3:44 PM IST

गेल्याच आठवड्यात संपूर्ण विदर्भ कड्याक्याच्या थंडीमुळे गारठला होता. त्यावेळी पुढील चार दिवसांमध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. तो अंदाज आता तंतोतंत खरा ठरताना दिसत आहे.

india
भारत

नागपूर - गेल्याच आठवड्यात संपूर्ण विदर्भ कड्याक्याच्या थंडीमुळे गारठला होता. त्यावेळी पुढील चार दिवसांमध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. तो अंदाज आता तंतोतंत खरा ठरताना दिसत आहे. गेल्या चार दिवसापासून मध्य भारतातील विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीची तीव्रता घटल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा - ईडीच्या नोटीसचा दुसरा अर्थ काढणे चुकीचे - प्रफुल्ल पटेल

आज विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांचे तापमान १० अंश सेल्सिअसच्या वर नोंदवण्यात आले आहे. साधारणपणे डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उपराजधानी नागपूरसह संपूर्ण विदर्भच गारठलेला असतो. मात्र, यावर्षी थंडी कमी जास्त होत असल्याने गेल्या वर्षीच्या थंडीचा रेकॉर्ड मोडीत निघण्याची शक्यता फार कमी झाली आहे. दोन वर्षापूर्वी आजच्या दिवशी नागपुरात ३.५ अंश सेल्सिअस इतक्या निचांक तापमानाची नोंद झाली होती.

थंड वाऱ्यांनी दिशा बदलली

गेल्या आठवड्यात नागपूरसह संपूर्ण विदर्भात थंडीचा जोर वाढलेला होता. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे विदर्भात शीत लहर आल्याची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, थंड वाऱ्यांनी अचानक दिशा बदलल्याने काही प्रमाणात थंडी कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार विदर्भातील सर्व जिल्ह्यातील तापमान वाढले आहे. आज नागपुरातील तापमान १४.२ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे. तर, अकोल्यात १२.६, अमरावती १४.८, बुलडाणा १२.४, चंद्रपूर- १४.६, गडचिरोली १४.०, गोंदिया १२.८, वर्धा १४.५, वाशिम १२.६ आणि यवतमाळ येथे १३.५ इतके तापमान नोंदवण्यात आले आहे. मधल्या काळात ढगाळ वातावरणामुळे थंडीचा प्रभाव कमी झाला होता, त्यानंतर उत्तरेकडे हिमवृष्टी व्हायला सुरवात झाली होती. त्यामुळे, संपूर्ण मध्य भारतात थंडीचा जोर वाढला होता. मात्र, आता पुन्हा एकदा हवेने आपली दिशा बादलल्यामुळे थंडीचा प्रभाव काही प्रमाणात कमी होईल, ज्यामुळे नागरिकांना काही अंशी दिलासा मिळेल.

डिसेंबर महिन्याच्या शेवटी तापमानात होते घट

गेल्या काही वर्षांपासून डिसेंबर महिन्याच्या शेवटी तापमानात प्रचंड घट नोंदवण्यात येत आहे. २०१८ साली २९ डिसेंबरच्या रात्री तापमान ३.५ पर्यंत खाली आले होते, तर गेल्या वर्षी देखील थंडीचा पारा ५.१ पर्यंत खाली आल्याची नोंद हवामान विभागाकडे आहे.

हेही वाचा - नागपुरातील गुन्ह्यांच्या प्रमाणात १५ टक्क्यांनी घट - गृहमंत्री अनिल देशमुख

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.