नागपूर - कुठलाही प्रकल्प तीन ते चार महिन्यांत येतो आणि जातो असे कधी होत नाही. कुणाकडे जादूची कांडी नसते की कांडी फिरवली की आला प्रकल्प असे मत आरोप करणारे काहीही आरोप करू शकतात अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ऊर्जा उपकरण निर्मिती झोन प्रकल्प मध्यप्रदेश राज्यात गेला आहे यावर प्रतिक्रिया विचारली असता मुख्यमंत्री नागपूरमध्ये विमानतळावर माध्यमांशी बोलत होते. आमचं सरकार उद्योगांना चालना देणारे सरकार आहे. राज्यात उद्योगांचे स्वागत करणारे सरकार आहे, नजीकच्या काळामध्ये तसे चित्र दिसेल असा दावाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
सरकार विकासाभिमुख - गेल्या अडीच-तीन महिन्यांमध्ये आम्ही काय केलं ते दिसेलचं, पण मागील सरकारने अडीच वर्षात काय केलं तेही आपल्याला दिसलेलं आहे असा टोलाही त्यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे. नजीकच्या काळात अनेक मोठे प्रकल्प आमच्याकडे येत आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल असा दावा त्यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन लाख कोटी रुपये विकास कामांसाठी मान्य केले आहेत, त्यामुळे हे सरकार विकासाभिमुख आहे असही ते म्हणाले आहेत.
राजकीय हस्तक्षेप नाही- राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावरील कारवाई पोलिसांनी कायदेशीर पद्धतीने केली आहे. त्यात कोणताही राजकीय हस्तक्षेप नाही असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. तसेच, संजय राऊत मोठे नेते आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.