ETV Bharat / state

Winter Session 2022 : विधानपरिषदेत सुब्रमण्यम स्वामींच्या ट्विटरवरून वाद; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आक्रमक - भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी ट्विट

भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींनी पंढरपूर मंदिराची पाहणी केल्यानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ( PM Narendra Modi )​ ट्विट ( Subramaniam Swamy tweet ) करुन टीका केली. या ट्विट वरून विरोधकांनी सरकारला घेरत सभागृहात ( Legislative Council ) गदारोळ केला. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधानांवरच्या ट्विटकडे कानाडोळा करत, आमदार मिटकरींवर आगपाखड (CM Eknath Shinde aggressive) के​​ली. तसेच पंतप्रधानांवरील टीका सहन करणार नाही, हिवाळी अधिवेशनात असा त्यांनी इशारा दिला.( Winter Session 2022 )

CM Eknath Shinde
एकनाथ शिंदे
author img

By

Published : Dec 27, 2022, 7:28 PM IST

मुंबई : पंढरपूर मंदिराची पाहणी केल्यानंतर भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ( PM Narendra Modi )​ ट्विट ( Subramaniam Swamy tweet ) करुन टीका केली. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी ( MLA Amol Mitkari ) लक्षवेधी मांडूताना, खासदाराच्या​ या​ ट्वीटचा उल्लेख ​परिषदेत ​केला. सत्ताधाऱ्यांनी यामुळे ​​गदारोळ ( Legislative Council ) घातला. राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे मिटकरींच्या मदतीला धावून आले. सभागृहात आरडाओरड करण्यापेक्षा हिंमत असेल तर थेट भाजप खासदाराला जाब विचारा, अ​शा शब्दांत​ कान टोचले. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदेंनी पंतप्रधानांवरच्या ट्विटकडे कानाडोळा करत, आमदार मिटकरींवर आगपाखड (CM Eknath Shinde aggressive) के​​ली. तसेच पंतप्रधानांवरील टीका सहन करणार नाही, असा इशारा दिला. ( Winter Session 2022 )

सुब्रमण्यम स्वामींच्या ट्विटवरून वाद : लक्षावधी वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेले पंढरपूर येथे कॉरिडॉर तयार केले जाणार आहे. पंढरपूर देवस्थान परिसरातील या कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यासाठी 300 कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे. कॉरिडॉरला पंढरपूरमधील स्थानिकांचा विरोध सुरु आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी, विधान परिषदेत आज लक्षवेधी चर्चेसाठी आणली. लक्षवेधीवर चर्चा करताना, कॉरिडॉर करताना बाधित मंदिरे कोणती आहेत. वारकऱ्यांना विश्वास घेतले आहे का, 279 हरकती सूचना आल्या आहेत. त्या कोणत्या आहेत. स्थानिकांना अपेक्षित आरखडा तयार केला आहे, तो किती दिवसांत अंतिम केला जाईल, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच, भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींनी पंढरपूरला भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदींवर टीका करणारे ट्वीट केले. मिटकरी यांनी हे ट्विट सभापतीची परवानगी घेऊन वाचले. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी यावर आक्षेप घेत सभागृह डोक्यावर घेतले. मिटकरींनी माफी मागावी, अशी मागणी केली. यावेळी गदारोळ झाल्याने सभापती नीलम गोऱ्हे यांनी पाच मिनीटसाठी सभागृह तहकूब केले.

मिटकरींच्या मदतीला खडसे : सभागृह पुन्हा सुरु होताच, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी मिटकरींचे विधान पटलावरुन काढून विषय संपवण्याची विनंती केली. परंतु, सत्ताधारी माफी मागणीवर ठाम राहिले. आमदार एकनाथ खडसे यावेळी मिटकरींसाठी धावून आले. संबंधित सदस्यांनी ट्वीट वाचून दाखवले. आक्षेप घेतल्यानंतर ते मागे घेण्याचे मान्य केल्यावर विषय संपावायला हवे. हे मिटकरींचे मत नाही. मात्र, इथे आरडाओरडा करणाऱ्यांनी सुब्रमण्यम स्वामींना जाब विचारा, असा सल्ला दिला. तसेच सत्ताधारी वक्तव्य पटलावरुन काढून टाकण्यास इच्छूक नसल्यास कायम ठेवा, अशी सूचना केली.

मुख्यमंत्र्यांची आगपाखड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य केले. मुख्यमंत्री म्हणाले की, विधान परिषद हे सर्वोच्च सभागृह आहे. या सभागृहाचे पावित्र्य राखायला हवे. वारकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन विकास करण्याचा निर्णय घेतला. सरकार यासाठी सकारात्मक आहे. मात्र, पंतप्रधानांवर असे वक्तव्य करण्याचा प्रकार म्हणजे एकप्रकारे अवमान आहे. पंतप्रधानांवर असे वक्तव्य कोणीही करु नये, आपली कुवत बघावी. कारण जी 20 मध्ये जगाचे नेतृत्व पंतप्रधान करत आहेत. देशाचा हा गौरव आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगताना विरोधकांना याचे वाईट वाटत का, असा सवाल केला. तसेच कोणाच्या भावना दुखवता कामा नये, अशी तंबी देत, मिटकरी यांचे वक्तव्य निंदाजनक असल्याचे म्हटले. कोणीही याचे समर्थन करणार नाही. पंतप्रधानांबाबत कोणी बोलले तर सहन करणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.

भाविकांवरील अन्याय सहन करणार नाही :अमोल मिटकरी यांचे वक्तव्य पटलावरुन काढून टाकले आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील उत्तर दिले आहे. पंढरपुरातील शेकडो लाखो भाविकांचे कान या लक्षवेधीकडे लागले आहे. त्यामुळे प्रत्येक सदस्याने तारतम्य ठेवायला हवे. कोणीही वाद वाढवू नका. जेणेकरुन भाविकांवर अन्याय झाला तर तो सहन होणार नाही. शिवाय, आमदारांच्या वादामुळे ही लक्षवेधी घालवू नका, अशी सूचना केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.