नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात निघालेल्या महाजनादेश यात्रेचे नागपूर शहरात आगमन झाले. नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. यावेळी या यात्रेचे नागपुरमध्ये जंगी स्वागत झाले.
१ ऑगस्टपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाजनादेश यात्रेला अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी वर्ध्यात रोड शो आणि सभा घेतल्या. आज ही यात्रा नागपुरात दाखल झाली असून नागपुरच्या चीचभवन ते काटोल नाक्यापर्यंत रोड शो केल्यानंतर मुख्यमंत्री पुढील ठिकाणी रवाना झाले.