नागपूर सण आणि उत्सवप्रिय आपल्या देशात गणेशोत्सवाला Ganeshotsav 2022 फार महत्त्व आहे. मात्र, बदलत्या काळानुसार आता गणेशोत्सवाचे स्वरूप देखील हळूहळू बदलू लागले आहे. निसर्गाला नुकसान न पोहचू देता पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची संकल्पना रुजायला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर गणेश उत्सव साजरा करण्याच्या पारंपरिक पद्धतीत देखील बदल होत असल्यास आपल्याला बघायला मिळत आहे. माती किव्हा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांमुळे जलाशये प्रदूषित होत असल्याने आता याला पर्याय म्हणून कायमस्वरूपी बाप्पा ही अभिनव संकल्पना पुढे येत आहे, त्यानुसार विविध धातू पासून तयार गणेश मूर्तीची Metal Ganesha Idols स्थापना करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. शाडू मातीच्या मुर्त्याचे दर दरवर्षी वाढत असल्याने पर्याय म्ह्णून धातू पासून तयार गणेशमूर्त्यांची मागणी वाढली Devotees In Nagpur Preferred Brass Ganesh आहे. धातू मध्ये मेटल, पितळ, पंचधातू आणि व्हाईट मेटलच्या गणेश मूर्त्यांना विशेष मागणी आहे.
मातीच्या गणेशमूर्त्यांचे दर ३० टक्यांची वाढले शाडू माती पासून तयार गणपती बाप्पाच्या मूर्त्यांना सर्वाधिक मागणी आहे. मात्र,शाडू मातीच्या मूर्त्यांचे दर दरवर्षी वाढते असल्याने एक फुटाच्या मूर्तीची किंमत दोन हजार रुपये इतकी झाली आहे. कोरोना नंतर यावर्षी सार्वजनिकरित्या साजरा होत असलेल्या गणेशोत्सवात मूर्त्यांची मागणी प्रचंड वाढली असताना शाडू मातीच्या मूर्त्यांच्या किमती तब्बल २५ ते ३० टक्यांची वाढले आहेत, त्यामुळे आता धातू पासून निर्मिती गणपती बाप्पाच्या मूर्त्यांची मागणी वाढत आहे.
धातूच्या मुर्त्यांची मागणी वाढली पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या संकल्पने अंतर्गत विविध धातूंपासून तयार गणेश मूर्त्यांची मागणी दरवर्षी वाढत आहे. यावर्षी सुद्धा धातू पासून निर्मित गणेश मूर्ती विकत घेण्यासाठी ग्राहक गर्दी करत असून या वर्षी ३० टक्यांची विक्री वाढली आहे. त्यातही पंचधातू आणि पितळच्या मूर्त्यांना सर्वाधिक मागणी आहे.