नागपूर- कोरोना प्रादुर्भवामुळे गेल्या सात महिन्यांपासून नागपूरातील शहर बस सेवा बंद होती. ती बस सेवा आता उद्यापासून सुरू करण्याचा निर्णय नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी यांनी घेतला आहे. त्यानुसार उद्यापासून शहरातील ४० प्रमुख मार्गांवर बस सेवा सुरू केली जाणार असल्याची माहिती मनपाचे परिवहन सभापती बाल्या बोरकर यांनी दिली आहे. प्राथमिक टप्प्यात ९० बसेस शहरभर धावणार असून त्यानंतर बसेसची संख्या वाढवण्या संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. बस सेवा बंद राहिल्याने गेल्या सात महिन्यात महानगर पालिकेच्या परिवहन विभागाला सुमारे वीस कोटींचा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे.
नागपूरात उद्यापासून शहर बस सेवा सुरू, ९० बसेस ४० मार्गांवर धावणार - नागपूर शहर बस सेवा बातमी
नागपूरातील शहर बससेवा उद्यापासून सुरू करण्याचा निर्णय नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी यांनी घेतला आहे. प्राथमिक टप्प्यात ९० बसेस शहरभर धावणार असून त्यानंतर बसेसची संख्या वाढवण्या संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.