नागपूर - राज्यात काही आवश्यक उद्योग सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तरी काही उद्योजक त्याचा किती गैरफायदा घेत असल्याची प्रचिती आज (बुधवारी) आली. शहरातील वाडी परिसरात पोलिसांनी मायक्रोपार्क लॉगिस्टिक या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस अडविली. त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा - 'पालघर प्रकरणात एकही 'मुस्लीम' व्यक्ती नाही; जातीचा रंग देणे दुर्दैवी'
या एकाच बसमध्ये तब्बल 57 लोक प्रवास करताना आढळले. आवश्यक उद्योगांमध्ये कर्मचाऱ्यांना पोहोचवण्यासाठी बसमधील एक सीटवर एक या प्रमाणे कर्मचारी बसावे, असे नियम असताना या बसमध्ये एक सीटवर तीन तीन कर्मचारी दाटीवाटीने बसून प्रवास करत होते. तर अनेक लोक उभेही होते. पोलिसांनी वडधामना परिसरात जेव्हा बस थांबविली. तेव्हा त्यात 57 प्रवाशी बसून आणि उभे राहून प्रवास करताना आढळले. पोलिसांनी बस ताब्यात घेतली आहे. तर संबंधित कंपनी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.