'महाजनादेश यात्रे'च्या माध्यमातून मुख्यमंत्री जनतेच्या भेटीला - चंद्रशेखर बावनकुळे - minister
येत्या 1 ऑगस्टपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'महाजनादेश यात्रे'च्या माध्यमातून जनतेच्या भेटीला येणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे दिली.
नागपूर - येत्या 1 ऑगस्टपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'महाजनादेश यात्रे'च्या माध्यमातून जनतेच्या भेटीला येणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिली.
या महाजनादेश यात्रेला अमरावती जिल्ह्यातील संत तुकडोजी महाराज यांच्या मोझरी गावातून १ ऑगस्टपासून प्रारंभ होत आहे. भारतीय जनता पक्षाच्या यात्रा प्रेमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःला वेगळे करू शकलेले नाहीत. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढील महिना भर महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून राज्य सरकारच्या 5 वर्षातील कामांचा लेखा-जोखा जनतेपुढे सादर करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत विजयी पताका रोवल्यानंतर आता आगामी काळात होणाऱ्या विधानसभेचे वेध लागले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांच्या पक्षांत्तर योजना यशस्वी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता नव्या मोहिमेवर निघणार आहेत.
या महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्यातील मतदारांसमोर सरकारच्या 5 वर्षातील कामांचा आढावा सादर करतील. या यात्रेचा समारोप ३१ ऑगस्ट रोजी नाशिक येथे होणार असल्याची माहितीही मंत्री बावनकुळे आणि आमदार अनिल सोले यांनी दिली आहे.
पहिल्या दिवशी दरेगाव येथे मुख्यमंत्र्यांचे स्वागत होईल. त्यानंतर आर्वी येथे मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर पूलगावला स्वागत सभा आणि रात्री ८ वाजता वर्धा येथेही जाहीर सभा होणार आहे, असा मुख्यमंत्र्यांचा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम राहणार असल्याची माहिती आमदार अनिल सोले यांनी दिली.
अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथून १ ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे.Body:लोकसभा निवडणुकीत विजयी पताका रोवल्यानंतर आता वेध लागले आहेत ते म्हणजे आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीचे...निवडणुकीच्या तोंडावर नेत्याचे पक्षांत्तर योजना यशस्वी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता नव्या मोहिमेवर निघानार आहेत...राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा काढणार आहेत... ही यात्रा येत्या १ ऑगस्टपासून अमरावती जिल्ह्यातल्या संत तुकडोजी महाराज यांच्या मोझरी गावापासून सुरू होईल...त्यानंतर मुख्यमंत्री वर्धा,नागपूर,भंडारा आणि गोंदिया जिल्यातील मतदारांसमोर सरकारच्या 5 वर्षातील कामांचा आढावा सादर करणार आहेत...या यात्रेचा समारोप ३१ ऑगस्ट रोजी नाशिक येथे होणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार अनिल सोले यांनी दिली आहे
बाईट- चंद्रशेखर बावनकुळे-पालकमंत्री
बाईट- प्रा.अनिल सोले- पूर्व विदर्भ प्रमुख
Conclusion: