नागपूर - विदर्भातील ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्था नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना सरकार दुर्लक्ष करत आहे. दुसरीकडे राज्य सरकारचे मंत्री हे पंढरपूरच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात लागले आहे. अजित दादा, जयंत पाटील हे सभेदरम्यान हजारोंची गर्दी गोळा करत असून यामध्ये कोरोनाच सुपर स्प्रेडर तयार होत आहे. या सर्व परिस्थितीकडे राज्यसरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत करत असल्याचा आरोप भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ते नागपूर प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
पंढरपूरच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत हजारोंची गर्दी करणाऱ्या अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे होते. पण तसे न करता आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पण दुसरीकडे मात्र, विरोधकांना आंदोलन करू नका, कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी सहकार्य करा.अशा सुचना राज्य सरकार देत आहे. आंदोलन करून गर्दी केल्यास गुन्हे दाखल करण्याच्या धमक्याही दिल्या जात असल्याचे बानवकुळे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष द्यावे
उद्धव ठाकरे यांनी आत तरी ग्रामीण भागाकडे लक्ष दिले पाहिजे. अजून दुर्लक्ष केले तर ग्रामीण भागातील लोक रस्त्यावर येतील. ग्रामीण भागात वीजेची मोठी समस्या आहे. राज्य सरकार विजेच्या प्रश्नानावर जागरूक झाले नाही तर आम्ही 10 हजार लोकांना घेऊन रस्त्यावर उतरू असा इशाराही बावनकुळे यांनी दिला आहे.
हेही वाचा - तब्बल २०० वर्ष जुने घर!
ग्रामीण भागात मंत्र्यांना पाठवून आरोग्य व्यवस्था उभी करावी
ग्रामीण भागात दुर्लक्ष केल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, केंद्रासरकरची टीम आढावा घेत फिरत आहे. पण महाराष्ट्र सरकार दुर्लक्ष करत आहे. एकाही मंत्र्यांचे ग्रामीण आरोग्यव्यस्थेकडे लक्ष नाही. मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना ग्रामीण भागत पाठवून व्यवस्था उभी करावी, अशी विनंती चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
ग्रामीण भागात कोरोना चाचणीच्या अहवालात विलंब होत असल्याने सुपर स्प्रेडरमध्ये वाढ
ग्रामीण भागात कोरोना चाचणीचे अहवाल येण्यास 5 ते 7 दिवस लागतात. यामुळे अहवाल मिळेपर्यंत तो रुग्ण सुपर स्प्रेडर बनून फिरत असतो. ग्रामीण भागात डॉक्टर रुग्णांची चाचणी करण्याऐवजी थातुरमातुर औषध देत आहे. यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहे. याचा गंभीर परिणाम आरोग्य व्यवस्थेवर झाला आहे. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी निर्णय घेऊन ग्रामीण भागात खाजगी रुग्णलायत रुग्णांची अँटिजेन चाचणी बंधनकारक करण्यासाठी ग्रामीण भागातील डॉक्टरांना दिशा निर्देह दिले पाहिजे. ग्रामीण भागातील परिस्थिती बिघडण्यापूर्वी राज्य सरकारने ठोस उपाय योजना करण्याची मागणी बावनकुळे यांनी केली आहे.
हेही वाचा - EXCLUSIVE : कोल्हापूरचा विकेंड लॉकडाऊन, पहा ईटीव्ही भारतच्या ड्रोन कॅमेऱ्यातून