ETV Bharat / state

कुचाशेठचा बर्थडे, मग चर्चा तर होणारच न भाऊ ! नागपुरात चक्क कोंबड्याचा वाढदिवस साजरा - birthday of a hen in Nagpur

लोकांसाठी केवळ तांबडा रस्सा आणि जिभेची चव ठरणार कोंबडा आहे. त्यामुळे त्याला कापून खाण्याचा पदार्थ हा दृष्टीकोण बदलण्यासाठी त्याला घरचा सदस्य करून घेतलं. त्याचे जिवंत असेपर्यंत संगोपन करू असे कागदेलवार कुटुंबीय सांगतात. त्याच्याशी असलेला जिव्हामुळे त्याचा वाढदिवस कायम स्मरणात राहावं यासाठी वाढदिवस साजरा करण्यात आला.

कुचाशेठचा बर्थडे
कुचाशेठचा बर्थडे
author img

By

Published : Sep 24, 2021, 8:12 AM IST

Updated : Sep 24, 2021, 8:49 AM IST

नागपूर - यापूर्वी अनेक पाळीव प्राण्याचे वाढदिवस थाटात साजरे होताना पाहिले असतील पण कोंबड्याचा वाढदिवस नक्कीच पहिला नसेल. नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातील कागदेलवार यांच्या नजरेस पडलेलं छोटसं पिल्लू रुबाबदार कोंबड्याच्या एक वर्षाचा वाढदिवस साजरा केला. त्यामुळे या वाढदिवसाची जोरदार चर्चा रंगली आहे. कोंबड्याचा वाढदिवस साधा वाटत असले पण तो थाटात आणि विशेष सजावटीत पार पडला. कोणाचे कोणत्या प्राण्यावर प्रेमात पडेल आणि घराच्या सदस्यासाठी चाहता होईल याचा नेम नाही. गाय, बैल, कुत्रा यांचे वाढदिवस, डोहाळ जेवण साजरे होतांना पाहिले आहे. पण नॉनव्हेज प्रेमींचा आवडता कोंबडा उमरेडच्या मंगळवार पेठेत राहणाऱ्या उमाकांत कागदेलवार यांच्या घरच्यांचा सदस्य बनला आहे. यावर विश्वास बसणार नाही. पण उमाकांत यांचा मुलगाच तर मुलगी सुरभी कागदेलवारचा तो जिवा भावाचा भाऊ आहे.

नागपुरात चक्क कोंबड्याचा वाढदिवस साजरा

कुचाचा कुचाशेठ कसा झाला...

कुचाचे औक्षण करताना
कुचाचे औक्षण करताना

वर्षभरापूर्वी कोंबड्याचे पिल्लू उमाकांत यांना सापडले. आज ते पिल्लू रुबाबदार कोंबड्याच्या रुपात पाहायला मिळतात. पण वर्षभरात तो जीवाभावाचा झाला. रोज सकाळी तो चहा मुरमुरे आवडीने खातो. लहान असताना कुच कूच आवाज करत असल्याने त्याचे नाव कुचा ठेवण्यात आले. बघता बघता वर्ष लोटत असतांना त्याचा थाट पाहता कुचा आता 'कुचाशेठ' झाले आहे. 'कुचाशेठ' म्हटले तर रुबाब तसाच आहे. खायला काजू, शेंगदाणे, श्रीखंड, काजू कतली हे आवडीचे पदार्थ आहे. त्याला इतर पदार्थही खायला देतात. पण त्या तुलनेत गोड अधिकच आवडीचे खात असल्याचे सुरभी कागदेलवार सांगतात.

श्रीखंड भरवत केले गोड तोंड...

कुचाचे औक्षण करताना
कुचाचे औक्षण करताना

उमाकांत कुचाशेठला मुलाप्रमाणेच जपतात. त्यामुळे एक वर्षाचा होताच वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले ठरवले. 20 सप्टेंबरला घरात वाढदिवस साजरा करताना आलिशान बैठक, बसायला मऊ गादी, विद्युत रोषणाई, दिव्यांची ओवाळणी आणि औक्षवन केले. विशेष आवडीचे मेनू आणि हाताने त्याला श्रीखंड भरून खाऊ घालत थाटात वाढदिवस साजरा करण्यात आला. पार्टीला शेजारी राहणाऱ्या बुलेट नावाच्या श्वानालाही बोलवण्यात आले होते.

कोणासाठी तो तांबडा रस्सा झाला असता, पण...

कुचाशेठचा बर्थडे
कुचाशेठचा बर्थडे

लोकांसाठी केवळ तांबडा रस्सा आणि जिभेची चव ठरणार कोंबडा आहे. त्यामुळे त्याला कापून खाण्याचा पदार्थ हा दृष्टीकोण बदलण्यासाठी त्याला घरचा सदस्य म्हणून मानलं. त्याचे जिवंत असेपर्यंत संगोपन करू असे कागदेलवार कुटुंबीय सांगतात. त्याच्याशी असलेला जिव्हाळ्यामुळे त्याचा वाढदिवस कायम स्मरणात राहावा यासाठी वाढदिवस साजरा करण्यात आला.

वर्षभरापूर्वी मिळालं होतं पिल्लू...

कागदेलवार यांच्या घरी किराणा दुकान आहे. वर्षभरापूर्वी कोंबड्यांचे पिल्ल घेऊन जाणाऱ्या ट्रकमधून हे पिल्लू दुकानासमोर वाहनातून पडले. तेव्हापासून त्याची काळजी घेतली. लहान असताना पायाला जखम झाल्याने ती महिन्याभरात दुरुस्त झाली. त्यांनतर त्याला मांजर आणि कुत्र्यांपासून वाचवत संरक्षण केले. आता त्याच्यासाठी घरही बांधून टाकण्यात आले. त्यामुळे त्याला कागदेलवार कुटुंब घराचा एक मुलगा म्हणून संगोपन करत आहे. पण त्याच्या वाढदिवसाचे फोटो सध्या झपाट्याने व्हायरल होत आहे. आणि त्याची चर्चाही आता सर्वत्र रंगली आहे.

Last Updated : Sep 24, 2021, 8:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.