ETV Bharat / state

'पेरलेले सोयाबीन न उगवण्यामागे तांत्रिक कारणांची शक्यता' - खरीप पेरणी हंगाम

काही ठिकाणी पेरणीनंतर बियाणे उगवलेच नसल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याबाबत बियाणे कंपन्यांना जबाबदार धरले जात आहे. मात्र, या मागची मुळ कारणे काय आहेत. याचा शोध घेणे गरजेचे आहे. एखादे बी पेरण्या आधी त्याची उगवणशक्ती किती आहे, हे तपासणे फार महत्वाचे आहे. ते कसे तपासावे याची क्रिया शेतकऱ्यांना ठाऊक आहे.

AGRICULTURE
'पेरलेले सोयाबीन न उगवण्यामागे तांत्रिक कारणाची शक्यता'
author img

By

Published : Jul 16, 2020, 12:34 PM IST

नागपूर - यावर्षी पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही, अशा आशयाच्या शेकडो तक्रारी शेतकऱ्यांकडून येत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी काही ठिकाणी धाडी देखील टाकल्या. या संदर्भात कृषीतज्ज्ञ सी.डी माई यांनी कृषिमंत्री भुसे यांना एक पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये सोयाबीनचे बियाणे का उगवले नाहीत? याचे तांत्रिक कारण शोधण्याचा सल्ला दिला आहे.

आपल्या देशात सोयाबीन वर संशोधन करणारी संस्था कार्यरत आहे. त्या संस्थेची मदत घेऊन या प्रश्नांची उत्तरे मिळवली जाऊ शकतात, असे देखील त्यांनी पत्रात सुचवले आहे. शिवाय सी.डी माई यांनी सुद्धा सोयाबीन का उगवले नसेल, या मागची कारणे विशद केली आहेत.

'पेरलेले सोयाबीन न उगवण्यामागे तांत्रिक कारणाची शक्यता'

खरीप हंगामाच्या बऱ्यापैकी पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, काही ठिकाणी पेरणीनंतर बियाणे उगवलेच नसल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याबाबत बियाणे कंपन्यांना जबाबदार धरले जात आहे. मात्र, या मागची मुळ कारणे काय आहेत. याचा शोध घेणे गरजेचे आहे. एखादे बी पेरण्या आधी त्याची उगवणशक्ती किती आहे, हे तपासणे फार महत्वाचे आहे. ते कसे तपासावे याची क्रिया शेतकऱ्यांना ठाऊक आहे.

सोयाबीन उगवलेच नसल्याच्या अनेक तक्रारी पुढे आल्या तेव्हा बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी जोर धरत आहे. पण यामागे काही तांत्रिक कारणे देखील असू शकतात. याकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज असल्याचे माई म्हणाले. मुळात सोयाबीन बियांवरील आवरण अत्यंत नाजूक असते. त्यामुळे जर्मिनेशन म्हणजेच उगवण शक्तीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. काही ठिकाणी पेरलेले बी उगवलेच आहे आणि उगवलेले बी जमिनीच्या वर आले नाही, हे दोन प्रकार पुढे आले आहेत.

सोयाबीनच्या बियानांमध्ये इम्ब्रियो, त्यानंतर इंडसफ्रम आणि सिडकोट अशा प्रकारचे तीन आवरण असतात. ज्यावेळी सोयाबीन पेरले जाते तेव्हा पाणी म्हणजेच न्यूट्रेशन मिळतं तेव्हा ते बी अंकुरित होऊन उगवते. मात्र बी जास्त खोल खड्ड्यात पेरले असेल तरी ते उगवत नसल्याचे मत माई यांनी व्यक्त केले आहे. सोयाबीन न उगवण्यामागे अनेक कारणे आहेत. त्याचा शोध घेण्यासाठी इंदोर येथील सोयाबीन रिचर्च संस्थेला सोबत घेऊन कारणमीमांसा करण्याचा सल्ला त्यांनी कृषी मंत्री दादा भुसे यांना पत्राच्या माध्यमातून दिला आहे. पुढील वर्षी अश्या घटना घडू नये म्हणून सोयाबीनचे बियाणे कसे हाताळावे या संदर्भांत जनजागृती करण्याचं देखील माई यांनी सुचवले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.