नागपूर : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार हे नेहमीच वादात अडकलेले असतात. १२ मार्च २०२२ ते १९ मे २०२३ ज्यावेळी त्या तक्रारदार महिला अधिकारी या नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात कर्तव्यावर असताना, रवींद्र भुयार यांनी वारंवार विनयभंग केला होता. एवढेच नाही तर कामाच्या वेळी सतत जातीवाचक अपशब्द देखील वापरले होते. याप्रकरणी सीताबर्डी पोलीस ठाण्यात कलम ३५३ (अ), ५०९, २९४, ५०६ आणि इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास सुरू आहे.
रवींद्र भुयारवर गंभीर आरोप : रवींद्र भुयार यांच्या विरुद्ध महिला अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, भुयार हे महिलेला जबरदस्तीने फोनवरील अश्लील व्हिडिओ दाखवायचे आणि पीडितेने प्रतिकार केल्यावर जातीवाचक शिवीगाळ करत होते. पीडितेने याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली, तेव्हा भुयारने ईडी आणि अँटी करप्शन ब्युरोची कारवाई केली जाईल अशी धमकी देऊन, वेळोवेळी त्रास दिल्याचा आरोप महिलेने केला आहे.
महिला तक्रार निवारण समितीकडे पाठवले जाणार : प्रादेशिक परिवहन कार्यालयातील एका महिला परिवहन अधिकाऱ्याने, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आरटीओ कार्यालयात खळबळ माजली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर चौकशी करण्यासाठी हे प्रकरण आता, महिला तक्रार निवारण समितीकडे पाठवले जाणार आहे.
जानेवारीत केली होती तक्रार : परिवहन अधिकारी रवींद्र भुयार वर्षभरापासून त्रास देत आहेत. मनात लज्जा निर्माण होईल, अशापद्धतीने अश्लील भाषेत बोलतात आणि अपमानित करत असल्याचा आरोप, महिलेने जानेवारी महिन्यातच परिवहन आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. यावर परिवहन विभागात अंतर्गत चौकशी सुरू झाली होती. मात्र, नंतर महिला अधिकाऱ्याने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यामुळे, रवींद्र भुयार यांच्या अडचणी वाढणार आहेत.
हेही वाचा -