ETV Bharat / state

Spray Painting : मेट्रोच्या डब्यांवर अज्ञात व्यक्तीने केले स्प्रे पेंटिंग, गुन्हा दाखल - Nagpur Metro

नागपूर मेट्रोच्या डब्यांवर अज्ञात व्यक्तीने स्प्रे पेंटिंग ( Spray painting on coaches of Nagpur Metro ) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तीने स्प्रे पेंटिंग केल्याने नागपूर मेट्रो ट्रेनच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर ( security system of Nagpur Metro is lax ) आला आहे.

Mahametro
Mahametro
author img

By

Published : Aug 10, 2023, 4:40 PM IST

अखिलेश हळवे यांची प्रतिक्रिया

नागपूर : मेट्रोच्या डब्यांवर स्प्रे पेंटिंग ( Spray painting on Nagpur Metro ) करणाऱ्या अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेट्रो ट्रेनवर एका अज्ञात व्यक्तीने स्प्रे पेंटिंग करून डेपोमध्ये प्रवेश केल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे मेट्रोची सुरक्षा व्यवस्था ढिसाळ ( security system of Nagpur Metro is lax ) असल्याचे दिसून येत आहे. या घटनेनंतर मेट्रो प्रशासनाने सोनेगाव पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

मेट्रोच्या डब्यांवर स्प्रे पेंटिंग : नागपूर शहरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मेट्रोचे महत्त्व वाढले आहे. हजारो नागपूरकर रोज मेट्रोच्या चकचकीत आणि आरामदायक डब्यातून प्रवास करतात. मेट्रोच्या प्रत्येक स्टेशनवर अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात असते. मात्र, मेट्रोच्या डेपोत घुसून एका अज्ञात आरोपीने मेट्रोच्या डब्यावर पेंटिंग ( Spray painting on metro coaches ) केल्याची घटना उघडकीस आली आहे.

आरोपीचा उद्देश काय : ऑरेंज लाईनवरील खापरी मेट्रो स्टेशनच्या पुढे काही अंतरावर मेट्रो ट्रेनचा डेपो आहे. इथे रोज अनेक मेट्रो ट्रेन पार्क केलेल्या असतात. यापैकी एका मेट्रोच्या इंजिनवर अज्ञाताकडून पेंटिंग केल्याचे दिसून येत आहे. मेट्रोच्या इंजिनवर DROPE KENN असा मजकूर स्प्रे पेंटिंगने लिहिण्यात आला आहे. मात्र असे करण्यामागे अज्ञात इसमाचा उद्देश काय होता? यासंदर्भात खुलासा होऊ शकलेला नाही.

DROPE KENN या शब्दाचा अर्थ काय : मेट्रोच्या इंजिनवर DROPE KENN असे इंग्रजीत लिहिण्यात आले आहे. या शब्दाचा नेमका अर्थ समजणे कठीण आहे. या कलाप्रकाराला 'स्प्रे ग्राफीटी' म्हणतात, अशी माहिती शासकीय चित्रकला महाविद्यालयाचे कला शिक्षक डॉ. किशोर इंगळे यांनी दिली.

प्रसिद्ध होण्यासाठी केलेला उपद्रव : इमारत, भिंत, बसेस, ट्रेनवर याप्रकारे संदेश लिहिण्याची सुरुवात 1960 मध्ये अमेरिकेत झाली. वर्णभेदाविरुद्ध कृष्णवर्णीय नागरिकांनी या प्रकाराचा खूप वापर केला होता. सोबतच लॅटिन अमेरिकन देशात तसेच जर्मनीच्या बर्लिन वॉलवर या ग्राफीटीचा वापर करण्यात आला होता. मेट्रोच्या डब्यावर करण्यात आलेली पेंटिंग प्रसिद्ध होण्यासाठी केलेला उपद्रव असावा, असा अंदाज ग्राफीटी विषयाचे जाणकार डॉ. किशोर इंगळे यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा -

  1. MahaMetro : महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांना मुदतवाढ नाही
  2. Nagpur Metro Railway Travel Discount: प्रवाश्यांसाठी नागपूर मेट्रोची नवी योजना; शनिवार आणि रविवार मिळणार ३० टक्के डिस्काउंट
  3. Nagpur Metro : नागपूर शहराबाहेरही मेट्रोचा विस्तार होणार, दुसऱ्या टप्प्यातील कामाला लवकरचं होणार सुरुवात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.