ETV Bharat / state

नागपूर : ईव्हीएम वाहतुकीचा व्हिडिओ व्हायरल केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

पंचायत भवन आणि बचत भवनमध्ये कॅमेरे बंद ठेवण्यात आल्याची तक्रार निराधार असून स्ट्राँग रूममधील कॅमेरे हे २४ तास सुरू होते, अशी माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुद्गल यांनी दिली.

जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुद्गल
author img

By

Published : Mar 29, 2019, 11:42 AM IST

नागपूर - स्ट्राँग रूम आणि ईव्हीएम वाहतुकीचा व्हिडिओ व्हायरल केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणा संबंधित सीसीटीव्ही व्हिडिओ नाना पटोले यांनी पत्रपरिषद घेऊन दाखवला होता. याची दखल निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतली.

जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुद्गल माध्यमांना माहिती देताना

कळमनामधून ट्रकमधून सुरक्षितपणे मतपेट्या निर्धारित जागेवर पोहोचवण्यात आल्या. याप्रसंगी २४ तास सीसीटीव्ही कॅमेरे सुरू होते. कोणतेही कॅमेरे बंद नव्हते. जो व्हिडिओ दाखवण्यात आला आहे त्यात कदाचित डिस्प्लेची समस्या असावी. रूम बाहेर पोलिसांचा पहारा असतो त्यांना दिसण्यासाठी डिस्प्ले सुरू असतात. डिस्प्लेमध्ये समस्या निर्माण होऊ शकते. पंचायत भवन आणि बचत भवनमध्ये कॅमेरे बंद ठेवण्यात आल्याची तक्रार निराधार असून स्ट्राँग रूममधील कॅमेरे हे २४ तास सुरू होते, अशी माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुद्गल यांनी दिली.

निवडणूक आयोगाने सुरक्षेसाठी जो प्रोटोकॉल जाहीर केला आहे, त्याची परिपूर्ण पालन आम्ही केले आहे. रूम बाहेर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. स्ट्राँगरूमला दुसरा कुठलाही दरवाजा नाही. स्ट्राँगरूम हे अतिशय सुरक्षितरित्या बंद ठेवला जातो अशी माहिती मुद्गल दिली. स्ट्राँगरूमचा व्हिडीओ काढणाऱ्या आणि तो व्हायरल करणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात आयपीसी च्या ४२३ आणि ४४७ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:नागपूर
काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी पत्रपरिषद घेऊन ज्या तक्रारी मांडल्या त्याची दखल निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतलीय कळमना मधून ट्रक वरून अतिशय सुरक्षितपणे मतपेट्या निर्धारित जागेवर पोहोचवण्यात आल्या याप्रसंगी 24तास सीसीटीव्ही कॅमेरे सुरू होते कोणतेही कॅमेरे बंद नव्हते जो व्हिडिओ दाखवण्यात आला आहे त्यात कदाचित डिस्प्ले ची समस्या असावी रूम बाहेर पोलिसांचा पहारा असतो त्यांना दिसण्यासाठी डिस्प्ले सुरू असतात. डिस्प्ले समस्या निर्माण होऊ शकते मात्र पंचायत भवन आणि बचत भवनमध्ये कॅमेरे बंद ठेवण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे ती निराधार असून स्ट्राँग रूम मधील कॅमेरे हे चोवीस तास सुरू होते अशी माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुद्गल यांनी दिली तसच निवडणूक आयोगाने सुरक्षेसाठी जो प्रोटोकॉल जाहीर केला आहे त्याची परिपूर्ण पालन आम्ही केले आहे रूम बाहेर पोलिस तैनात करण्यात आले आहेत. स्ट्रॉन रूम ला कुठलेही दुसरे दार नाही स्ट्रॉंग रूम हे अतिशय सुरक्षित रित्या बंद ठेवला जातो अशी माहिती त्यांनी दिली

Body: या प्रकरणी सीसीटीव्ही बद्दल चा व्हिडिओ नाना पटोले यांनी काल पत्रपरिषद घेऊन दाखविला. स्ट्रॉंग रूमचा व्हिडिओ काढणाऱ्या आणि तो वायरल करणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात आयपीसी च्या ४२३ आणि ४४७ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.