ETV Bharat / state

नागपूरमध्ये चिमुरडीच्या हत्येनंतर आणखी एका महिलेचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ - burn deadbody found nagpur latest news

हा मृतदेह लीलाबाई सूर्यभान वासनिक यांचाच असल्याची खात्री त्यांच्या मुलांनी पटवून दिली आहे. मात्र,  तरीही डीएनए टेस्ट करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

burn deadbody of women found in nagpur
नागपूरमध्ये महिलेचा संशयास्पद स्थितीत जळालेला मृतदेह आढळला
author img

By

Published : Dec 10, 2019, 9:48 AM IST

नागपूर - जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात लिंगा गावात 5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराचे प्रयत्न केल्यानंतर तिची हत्या केल्याची घटना सोमवारी समोर आली. या घटनेला २४ तास होत नाही तोवरच कुही तालुक्यातील डोंगरमैदा येथील शिवारात महिलेचा संशयास्पद स्थितीतील जळालेला मृतदेह आढळला आहे. या घटनेने खळबळ माजली आहे. लीलाबाई सूर्यभान वासनिक (वय ६५ रा. दहेगाव) असे मृत महिलेचे नाव आहे.

हेही वाचा - वाईच्या पसरणी घाटात खासगी ट्रॅव्हल्स-शिवशाही बसचा भीषण अपघात; 27 जण जखमी तर 4 गंभीर

हा मृतदेह लीलाबाई सूर्यभान वासनिक यांचाच असल्याची खात्री त्यांच्या मुलांनी पटवून दिली आहे. मात्र, तरीही डीएनए टेस्ट करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळावरून पोलिसांनी डोक्याची कवटी, केस, हाडे, चपलेचा तुकडा आणि बॅग जप्त केली आहे. काही वर्षांपासून लीलाबाई येथे राहत होत्या. त्यांची डोंगरमैदा येथे शेती आहे. धानाची मळणी करण्यासाठी त्या २ डिसेंबरला शेतावर गेल्या होत्या. तेव्हापासून त्या घरी परतल्या नव्हत्या. त्यांच्या दोन्ही मुलांनी डोंगरमैदा येथे येऊन शोध घेतला असता शेतातील तणसात जळालेला अवस्थेत मृतदेह आढळला. पुढील तपास पोलीस करीत आहेत. मात्र, या सततच्या होणाऱ्या घटनांमुळे पोलीस प्रशासन काय करत आहे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Intro:नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील डोंगरमैदा येथील शिवारात महिलेचा संशयास्पद स्थितीतील जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे.
Body:मृतदेह लीलाबाई सूर्यभान वासनिक (वय ६५, दहेगाव) यांचा असल्याची खात्री मुलांनी पटवून दिली आहे तरीही पोलिस डीएनए टेस्ट करणार आहेत... घटनास्थळावरून पोलिसांनी डोक्याची कवटी, केस, हाडे, चपलेचा तुकडा व बॅग जप्त केली आहे... काही वर्षांपासून लीलाबाई नागपूर येथे राहात असून त्यांची डोंगरमैदा येथे शेती आहे... धानाची मळणी करण्यासाठी त्या २ डिसेंबरला शेतावर गेल्या होत्या... तेव्हापासून घरी आल्या नव्हत्या... दोन्ही मुलींनी डोंगरमैदा येथे येऊन शोध घेतला असता शेतातील तणसात जळालेला अवस्थेत मृतदेह आढळला... हा मृत्यू नेमका कसा झाला याचा तपास पोलीस करीत आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.