नागपूर - प्रेमीयुगुलात टोकाचा वाद झाल्याने महिलेने अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून महिलाने स्वताला जाळून घेतल्याची घक्कादायक घटना शुक्रवारी नागपूर शहरात घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी प्रियकर शाबाद आलम (32) याला अटक केली आहे.
महिलेचे युवकाशी विवाहबाह्य संबंध -
शुक्रवारी सायंकाळी दोघात वाद झाला होता. वाद विकोपाला गेल्याने अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून महिलाने स्वताला जाळून घेतल्याने तिचा मृत्यू झाला. परंतु महिलेने दिलेल्या मृत्यूपूर्वी दिलेल्या बयानात वेगळीच माहिती दिली होती. रस्ताने जात असताना एक जोडपं भांडण करत होते. त्याला वाचवण्यासाठी गेले असता, त्या युवकाने पेट्रोल टाकून माचीस काडी अंगावर फेकली. असे तिने म्हटले होेते. पण प्रत्यक्षात पोलिसांनी चौकशी केली असता, महिलेला सांगितलेले घटनास्थळ ते नव्हते. दरम्यान, ही विवाहित असून तिचे एक शाबाद नामक युवकाशी प्रेमसबंध होते, ही माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनतर पोलिसांनी शाबाद आलम याला अटक केली आहे.
सोशल मीडियावर झाली होती भेट -
या महिलेची युवकाशी फेसबूकवर मैत्री झाली. त्यानंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. परंतु या महिलेने ती विवाहित असल्याचे लपवून ठेवल. अखेर ती महिला तिच्या लग्नाविषयी बोलण्यासाठी गेली असताना वाद त्या दोघांत वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर महिलेने पेट्रोल टाकून स्वतःला जाळून घेतले. पण ही हत्या होती, की आत्महत्या, हे अजून स्पष्ट झालेले नाही.
प्रियकराचा फ्लॅटवर घडला होता प्रकार -
महिलेने दिलेली माहिती खोटी असून ते जळीतकांड घडला ते घटनास्थळ बहिरामजी टाऊन येथील आकार बिल्डिंग क्रमांक 22 च्या पाहिल्या माळ्यावर फ्लॅट क्रमांक 12 मधील असल्याचे उघडकीस आले. हा युवक या फ्लॅटमध्ये साधरण 4 वर्षांपासून राहात होता. तसेच या ठिकाणी पोलिसांना महिलेची ज्युपिटर गाडी, चप्पल आणि डब्बा मिळाला होता.
म्हणून महिलेने दिली खोटी माहिती -
या प्रकरणात महिलेचे विवाहबाह्य संबंध होते. ती या युवकाशी विवाह करण्यास इच्छुक होती. पण युवक इच्छुक नसल्याने दोघांमध्ये तणाव होता. घटनेच्या दिवशी प्रियकरानेच तिला दवाखान्यात नेले असल्याचे सुद्धा पुढे आले. हे सगळं कुटुंबियांना कळू नये, म्हणून तिने खोटे बयान दिले असावे, असा अंदाज बांधला जात आहे.
हेही वाचा - नवी दिल्ली : मृत्यूनंतर शिक्षिकेने अनेकांना दिला जीवनाचा आणि धार्मिक बंधुतेचा नवा प्रकाश