ETV Bharat / state

प्रेमासाठी वाट्टेल ते ! प्रेयसीला आवडले पार्शियन मांजर, प्रियकराने थेट केली डॉक्टरच्या घरात चोरी - प्रेयसी

प्रेयसीला आवडलेली मांजर प्रियकराने चोरली.

प्रेमासाठी वाट्टेल ते ! प्रेयसीला आवडले पार्शियन मांजर, प्रियकराने थेट केली डॉक्टरच्या घरात चोरी
author img

By

Published : Apr 28, 2019, 4:40 PM IST

Updated : Apr 29, 2019, 8:07 PM IST

नागपूर - प्रेमासाठी वाट्टेल ते करणारे प्रियकर भेटतील मात्र, प्रेमात चोरी करणाऱ्या प्रियकराची कहानी वेगळीच. नागपूर येथील मानकापूर पोलीस हद्दीतील एका प्रियकराने आपल्या प्रेयसीसाठी डॉक्टरच्या घरातील पार्शियन मांजर चोरली. तुम्ही म्हणाल मांजर, होय मांजरच, या मांजरीची किंमत तब्बल ३० हजार रुपये इतकी आहे.

प्रेमासाठी वाट्टेल ते ! प्रेयसीला आवडले पार्शियन मांजर, प्रियकराने थेट केली डॉक्टरच्या घरात चोरी

डॉ. अंजुमन शाहिद यांचे मानकापूर पोलीस ठाणे हद्दीत निवासस्थान व रुग्णालय आहे. त्यांनी एक पार्शियन मांजर पाळलेले आहे. आरोपी नीलेशा बनसोड आजारी असल्यामुळे उपचाराकरता डॉ. शाहिद यांच्याकडे दवाखान्यात आली होती. त्यावेळी तिला ती मांजर दिसली आणि तिला ते मांजर आवडले. घरी परतल्यावर तिने तिच्या प्रियकर आरोपी हर्षल मानापुरे याला मांजरी बाबत सांगितले. तेव्हा आपल्या प्रेयसीची इच्छा पूर्ण करण्यासाठी हर्षलने मांजरीची चोरी करण्याचा बेत आखत मांजर चोरली.

जिवापाड प्रेम असलेले मांजर चोरीला गेल्याची तक्रार डॉ. शाहिद यांनी मानकापूर पोलीस ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी डॉ. शाहिद यांच्या दवाखान्याबाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा फुटेजवरून आरोपी प्रियकरास विचारपूस केली. त्याने मांजर चोरीची कबुली दिली. त्यांनतर प्रेयसीच्या घराची झडती घेण्यात आली व त्यांच्याकडून पोलिसांनी चोरी केलेली मांजर ताब्यात घेत डॉ. शाहिद यांना परत देण्यात आला.

Intro:प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं असा पण बरेचदा ऐकलं आहे पण नागपूर येथील मानकापूर पोलीस हद्दीमधील एका प्रियकराने आपल्या प्रेयसीसाठी एका डॉक्टरच्या घरातील सुमारे तीस हजार रुपये किमतीची पार्शियन मांजर चोरली.

Body:डॉ.अंजुमन शाहिद यांचे मानकापूर पोलीस ठाण्याहद्दीत एक दवाखाना व निवासस्थान आहे यांच्या कडे पार्शियन मांजर पाळीव आहे. आरोपी नीलेशा बनसोड ही आजारी असल्यामुळे उपचाराकरता डॉ.शाहिद यांच्याकडे दवाखान्यात आली होती.त्यावेळी तिला ती मांजर दिसली आणि तिचे त्यावर मन आले. घरी परतल्यावर तिने तिच्या प्रियकरास (आरोपी हर्षल मानापुरे) मांजरी बाबत सांगितले. आणि आपल्या प्रेयसीची इच्छा पूर्ण करण्यासाठी मांजरी ला चोरी करण्याचा बेत केला व मांजर चोरण्यात आली.

Conclusion:आपली जिवापाड प्रेम करीत असलेली मांजर चोरीला गेल्याची तक्रार डॉ.शाहिद यांनी मानकापूर पोलीस ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी डॉ.शाहिद यांच्या दवाखान्याबाहेरील CCTv फुटेज वरून आरोपी प्रियकरास विचारपूस केली. त्यांनतर त्याने मांजर चोरीची कबुली दिली. प्रेयसीच्या घराची झडती घेण्यात आली व त्यांच्या कडून पोलिसांनी ती मांजर ताब्यात घेतली. व डॉ. शाहीद यांना परत करण्यात आली.

कृपया नोंद घ्यावी
वरील बातमीचे संपूर्ण visuals हे reporter अँप ने पाठवीत आहे त्याचा slug खालील प्रमाणे
R_MH_Nagpur_April28_CatRobbery_Visuals_Sarang
Last Updated : Apr 29, 2019, 8:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.