नागपूर: नागपूरच्या संजय गांधी परिसरात मेघा सुरज कांबळे हिने गळफास लावून आत्महत्या केली. मेघाचा तीन वर्षांपूर्वी त्याच परिसरात राहत असलेल्या सुरज सोबत प्रेम विवाह झाला होता. सुखी संसार सुरू असताना पत्नी वारंवार मोबाईल वर दिसत असल्याने नेहमी प्रमाणे पती सुरजने तिला हटकले. शुल्लक कारणातून वाद झाला. ती माहेरी निघून गेली. माहेरीच तिने आपल्या दोन वर्षांच्या चिमुकल्या देखत त्महत्या केली. कुटुंबियांची कुठलीही तक्रार नाही पण हटकल्याच्या करणातून आत्महत्या केल्याचे यशोधरा नगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जाधव यांनी सांगितले.
अपमानाच्या भावनेमुळे संपवले जीवन
दुसरी घटना शिवंगाव सीआरपीएफ कॅम्पमध्ये घडली, पूनम राजकुमार डगवार असे मृत महिलेचे नाव आहे. तीचे पती राजकुमार झारखंडला कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी ते घरी आले होते. तेव्हा ते सासुरवाडीला मुक्कामी होते. पूनम मोबाईलवर चॅटिंग करताना दिसल्याने त्याने तिला हटकले. यावरुन आई वडिलांनीही तिला रागावले. नंतर पती पुन्हा वापस गेला. पण पूनमला आपला अपमान झाला या भावनेने त्रस्त होती यातच तीने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. अशी माहिती पोलीस कर्मचारी दिलीप बेलेकर यांनी दिली.
दारू पिण्यावरुन वाद युवकाची आत्महत्या
राजीवनगर येथे पत्नीने दारू पिण्यावरुन बोलल्यामुळे पतीने गळफास लावून आत्महत्या केली. मुकेश शिंगाडे असे 20 वर्षीय मृतकाचे नाव आहे. मुकेश हा मूळचा भंडाऱ्या जिल्ह्यातील तुमसरचा राहवासी. दोन वर्षांपूर्वी त्याचा शेजारी रहाणाऱ्या मुलीशी प्रेमविवाह झाला. घरच्यांचा विरोध असलल्यानें तो नागपुरात आला. एमआयडीसीमध्ये काम करत सुखी संसार सुरू झाला. त्याला चार महिन्याचा मुलगा आहे. दरम्यान त्याला दारुचे व्यसन लागले. याच कारणावरून त्यांच्यात नेहमी वाद होत होते. 28 डिसेंबराला असच वाद झाला. 29 डिसेंबराला त्याने घरातच गळफास लावून आत्महत्या केली.
Suicide Due To Chatting : मोबाईल चॅटींग वरून दोघींची तर दारु वरुन युवकाची आत्महत्या
मोबाईल वर चॅटिंग (mobile Chatting) करणाऱ्या पत्नीला पतीने रागावल्यामुळे दोन विवाहित महिलांनी रागाच्या भरात गळफास लावत जीवनयात्रा संपवल्याची (Two women ended their lives) घटना नागपुरात समोर आली आहे. या दोन वेगवेगळ्या घटना आहेत. मात्र एकाच कारणावरुन आठवडा भरातच त्या घडल्या आहेत. तर तिसऱ्या घटनेत पत्नीने दारू पिण्यावरुन हलटकल्यानें एका युवकाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.