ETV Bharat / state

'जॉय राईड'च्या माध्यमातून महा मेट्रोत भ्रष्टाचार; प्रशांत पवार यांचा गंभीर आरोप - prashant pawar

नागपूर महामेट्रोने केवळ १२ महिन्यांकरिता हैदराबाद मेट्रोचे २ कार (कोचेस) एल अँड टी कंपनीकडे भाड्याने मागितले होते. मात्र, एल अँड टी कंपनीने कोचेस १२ महिन्यांसाठी देण्यास नकार देत ४ वर्षांचा करार करण्याची अट ठेवली. यावेळी कोणतेही संयुक्तिक कारण नसताना महामेट्रोने एल अँड टी कंपनीची मागणी मान्य करत १८ मे २०१७ रोजी प्रतिवर्ष १५ कोटी रुपये प्रमाणे ४ वर्षांकरिता हैदराबाद मेट्रोचे २ कार भाड्याने घेतले होते. भाड्याने घेतलेले डबे जॉय राईडसाठी उपयोगात आणण्यात आले असून मेट्रोच्या कामात जॉय राईडचे प्रवधानच नसल्याचा दावा देखील प्रशांत पवार यांनी केला आहे.

जॉय राईडच्या माध्यमातून महा मेट्रोत भ्रष्टाचार; प्रशांत पवार यांचा गंभीर आरोप
author img

By

Published : Jun 19, 2019, 10:07 PM IST

नागपूर - महा मेट्रोने गरज नसताना एल अँड टी कंपनीच्या फायद्यासाठी हैदराबाद मेट्रोचे २ कार (कोचेस) चार वर्षांकरिता प्रति वर्ष १५ कोटी रुपये दराने भाड्याने घेतले. या व्यवहारात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप 'जय जवान, जय किसान संघटने'चे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी केला आहे. हा भ्रष्टाचार महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी केला असून या प्रकरणाची 'कॅग'ने देखील दखल घेतल्याचा दावा पवार यांनी केला आहे.

प्रशांत पवार पत्रकार परिषदेत बोलताना...

नागपूर महामेट्रोने केवळ १२ महिन्यांकरिता हैदराबाद मेट्रोचे २ कार (कोचेस) एल अँड टी कंपनीकडे भाड्याने मागितले होते. मात्र, एल अँड टी कंपनीने कोचेस १२ महिन्यांसाठी देण्यास नकार देत ४ वर्षांचा करार करण्याची अट ठेवली. यावेळी कोणतेही संयुक्तिक कारण नसताना महामेट्रोने एल अँड टी कंपनीची मागणी मान्य करत १८ मे २०१७ रोजी प्रतिवर्ष १५ कोटी रुपये प्रमाणे ४ वर्षांकरिता हैदराबाद मेट्रोचे २ कार भाड्याने घेतले होते. भाड्याने घेतलेले डबे जॉय राईडसाठी उपयोगात आणण्यात आले असून मेट्रोच्या कामात जॉय राईडचे प्रवधानच नसल्याचा दावा देखील प्रशांत पवार यांनी केला आहे.

हैदराबाद मेट्रोचे कामकाज ठप्प पडले असताना एल अँड टी कंपनीला फायदा व्हावा, याकरिता नागपूर मेट्रोने कोणतीही गरज नसताना एल अँड टी कंपनीचे मेट्रो डब्बे जॉय राईडच्या नावाने ४ वर्षांकरिता ६० कोटी रुपयांचा करार केला. हा करार खासगी कंपनीसोबत करताना टेंडर प्रक्रिया राबवणे गरजेचे होते. मात्र, या सर्व प्रक्रियेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप देखील पवार यांनी केला आहे.

करारानुसार २५ जुलै २०१८ रोजी नागपूर मेट्रोला एल अँड टी कंपनीने मेट्रो कारची डिलेव्हरी दिली. या सर्व प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, नागपूर मेट्रोने स्वतःच्या मेट्रो कोचेससाठी चीनच्या सी.आर.आर.सी कंपनीसोबत करार केला. या कंपनीकडून १५ जानेवारी २०१९ डब्बे प्राप्त होणार होते. तरी देखील एल अँड टी कंपनीसोबत ४ वर्षांचा करार करण्याची काय गरज होती? असा सवाल पवार यांनी उपस्थित केला आहे.

Intro:एल अँड टी कंपनीला आर्थिक फायदा पोहचवण्यासाठी महामेट्रोने जॉय राईडच्या माध्यमातून ७५ कोटी रुपयांचा भ्रष्ट्राचार केल्याचा गंभीर आरोप जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी केलाय.... महामेट्रोने गरज नसताना एल अँड टी कंपनीच्या अखत्यारीत असलेल्या हेंद्राबाद मेट्रोचे २ कार (कोचेस) ४ वर्षांकरिता प्रति वर्ष १५ कोटी रुपये या दराने भाड्याने घेतले होते.... या व्यवहारात तब्बल ७५ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप प्रशांत पवार यांनी केलाय 
Body:नागपूर महामेट्रोने केवळ १२ महिन्यांकरिता हेंद्राबाद मेट्रोचे २ कार (कोचेस ) एलएनटी कंपनीकडे किरायाने मागितले होते.....मात्र एल अँड टी कंपनीने कोचेस १२ महिन्यांसाठी देण्यास नकार देत ४ वर्षांचा करार करण्याची अट ठेवली.... यावेळी कोणतेही सयुक्तिक कारण नसताना महामेट्रोने एल अँड टी कंपनीची मागणी मान्य करत १८ मे २०१७ रोजी प्रति वर्ष १५ कोटी रुपये प्रमाणे ४ वर्षांकरिता हेंद्राबाद मेट्रोचे २ कार किरायाने घेतले होते.....किरायाने घेतलेले डब्बे जॉय राईड साठी उपयोगात आणण्यात आले असून मेट्रोच्या कामात जॉय राईडचे प्रवधानच नसल्याचा दावा देखील प्रशांत पवार यांनी केलाय...हेंद्राबाद मेट्रोचे कामकाम ठप्प पडले असताना एल आनंद टी कंपनीला फायदा व्हावा या करिता नागपूर मेट्रोने कोणतीही गरज नसताना एल अँड टी कंपनीचे मेट्रो डब्बे जॉय राईडच्या नावाने ४ वर्षांकरिता ६० कोटी रुपयांचा करार केला.... हा करार खासगी कंपनी सोबत करताना टेंडर प्रक्रिया राबवणे गरजेचे होते मात्र या सर्व प्रक्रियेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय......करारा नुसार २५ जुलै २०१८ रोजी नागपूर मेट्रोला एल अँड टी कंपनीने मेट्रो कारची डिलेव्हरी दिली....या सर्व प्रक्रियेतील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे नागपूर मेट्रोने स्वतःच्या मेट्रो कोचेस साठी चीनच्या सी आर आर सी कंपनी सोबत करार केला असताना सी आर आर सी कंपनी कडून १५ जानेवारी २०१९  डब्बे प्राप्त होणार होते तरी देखील एल अँड टी कंपनी सोबत ४ वर्षांचा करार करण्याची काय गरज होती असा प्रश्न उपस्थित करत जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्या ७५ कोटी रुपयांचा भ्रष्ट्राचार केल्याचा गंभीर आरोप केलाय..... या संदर्भात कॅग ने देखील हे प्रकरण गांभीर्याने घेतल्याचा दावा प्रशांत पवार यांनी केलाय 

बाईट- प्रशांत पवार- अध्यक्ष जय जवान जय किसान संघटना 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.