नागपूर - नागपुरात कोरोनाच्या संकटानंतर जीवघेणा आजार म्हणून म्यूकरमायकोसिसने अनेकांना बाधित केले. यात डोळ्याला, मेंदूच्या आतील भागानंतर पोटातील आतड्यांमध्ये सुद्धा म्यूकरमायकोसिस म्हणजे काळी बुरशी आढळून आली आहे. नागपुरातील 70 वर्षीय एका रुग्णाच्या पोटात दुखत असल्याने काही परिक्षणामध्ये काळ्या बुरशीचा संसर्ग झाल्याचा प्रकार समोर येत आहे. नागपूर विदर्भातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील हा पहिला रुग्ण असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
'या' रूग्णालयात सुरू आहेत उपचार
नागपुरात पोटाच्या आतड्यांतील काळ्या बुरशीच्या रुग्णांवर सध्या सेव्हनस्टार रुग्णालयात उपचार सुरू आहे. या व्यक्तींचा डावा डोळा हा निकामी झाला असून त्यांचावर अन्य एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली होती. पण त्यांना उजवा डोळा आणि ओटीपोटात दुखत असल्याने बुरशीच्या संसर्गाने पुन्हा जकडले आहे. यामुळे त्यांना 19 जुलैला सेव्हनस्टार रुग्णलायत डॉ. प्रशांत राहाटे यांच्याकडे दाखल करण्यात आले. प्रसिद्ध लॅप्रोस्कोपीक आणि एंडोस्कोपीक तज्ज्ञ डॉ. प्रशांत राहाटे यांनी कोलोनोस्कॉपी केली असता काहीच आढळून आले नाही. यात त्यांनतरही पोटात दुखत असल्याने पोटावर सुजन आल्याने लॅप्रोटॉमी केले असता पोटाच्या आतील आतड्यांच्या शेवटच्या भागात(सिगमाईड कोलनवर) सहा इंचाचा भागात काळी बुरशी आढळून आली. यावर डॉ. प्रशांत राहाटे यांच्या देखरेखीत रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. तर दुसरीकडे असाच एक रूग्ण पुण्यात आढळल्याची माहिती आहे. या प्रकारावर तज्ज्ञ डॉ. अविनाश भोंडवे यांनीही चिंता व्यक्त केली आहे.
हेही वाचा -राज्यात एक कोटी पूर्ण 'लसवंत', 3.16 कोटी लोकांना मिळाला पहिला डोस