ETV Bharat / state

रामटेकची जागा शिवसेनेला गेल्याने भाजप कार्यकर्त्यांचा अपेक्षाभंग - bjp

जवळपास ९० हजार कार्यकर्त्यांची बांधणी केल्याचा भाजपचा दावा आहे. लोकसभा निवडणूक लढण्याची सर्व तयारी भाजपकडून करण्यात आली होती.

भाजप नेता
author img

By

Published : Mar 14, 2019, 1:02 PM IST

नागपूर - गेल्या चार वर्षात भारतीय जनता पक्षाने रामटेक लोकसभा मतदारसंघात चांगलीच ताकद वाढवली होती. युतीची शक्यता नसल्याने भाजप कार्यकर्ते या मतदारसंघात निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. पण, ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने त्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरले गेले आहे. नाईलाजस्तव भाजप कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या उमेदवारासाठी मते मागावी लागणार आहेत. कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन कसे घडवून आणावे, हा प्रश्न दोन्ही पक्षांच्या नेत्यांसमोर आहे.

व्हीडिओ

२०१५ ला राज्यात युतीचे सरकार सत्तेत आले. तेव्हापासून शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षात कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. एकमेकांची उणीदुणी काढण्याची एकही संधी दोन्हीकडच्या नेत्यांनी सोडली नाही. याच काळात भाजपने रामटेक मतदारसंघात आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली. जवळपास ९० हजार कार्यकर्त्यांची बांधणी केल्याचा भाजपचा दावा आहे. लोकसभा निवडणूक लढण्याची सर्व तयारी भाजपकडून करण्यात आली होती.

पण, युतीची घोषणा झाली आणि ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. ही जागा भाजपला मिळावी, यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. पण, पक्षाच्या नेत्यांनी ही जागा शिवसेनेकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कार्यकर्त्यात नाराजी पसरली आहे. ज्या शिवसेनेला इतके दिवस विरोध केला, त्यांचाच प्रचार कसा करावा? हा प्रश्न त्यांना सतावत आहे. काँग्रेसने येथून मुकुल वासनीक यांना रिंगणात उतरवले आहे. तर , शिवसेना पुन्हा एकदा कृपाल तुमाणे यांनाच उमेदवारी देण्याची शक्यता आहे.

Intro:भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत युती झाल्याने नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदार संघात भाजपने साडेचार वर्षात जमवलेल्या 90 हजार कार्यकर्त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे रामटेक लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेच्या कोट्यात असल्याने आता नाईलाजास्तव भाजपच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या उमेदवारासाठी मते मागावी लागेल त्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन घडवून आणण्याचे आवाहन युतीच्या दोन्ही पक्षांपुढे आहे

Body:2014 मध्ये राज्यात भारतीय जनता पक्ष आणि आणि शिवसेनेचे सरकार स्थापन झाल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये कुरघोडीचे राजकारण सलग साडेचार वर्ष राज्यातील जनतेने अनुभवले आहे.... विविध मुद्द्यांवर आणि प्रश्नांवर नेहमीच एकमेकांची उनी धूनी काढणारे सत्ताधारी पक्ष 2019 च्या निवडणुकीत एकमेकांविरोधात लढतील असंच चित्र निर्माण झाले होते, त्यामुळेच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने राज्यात स्वबळावरील टाकत वाढवायला सुरुवात केली होती.....शिवसेनच्या ताब्यातील रामटेक लोकसभा मतदार संघात तर भारतीय जनता पक्षाने कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली होती.... 2019 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष एकटा लढल्यास रामटेकची जागा सहज जिंकता यावी या करिता भाजपने बूथ लेवल वर कार्यकर्त्यांची नियुक्ती देखील केली होती....एका बूथ वर 25 ते 50 कार्यकर्त्यांची टीम गेली साडेचार वर्षांपासून सक्रिय होती,मात्र युतीची मूठ बांधल्या गेल्याने साडेचार वर्षात जमवलेल्या कार्यकर्त्यांची फोज नाराज झाली आहे.....रामटेकची जागा भाजपच्या वाट्याला यावी या करिता जोरदार प्रयत्न करण्यात आले होते मात्र शेवटी पक्षश्रेष्ठींनी जैसे थे च्या स्थितीवर शिक्कामोर्तब केल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह गडगडला आहे....नाईलाजाने शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करावा लागणार असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संकोचाही भावना निर्माण झाली आहे....भाजप आणि शिवसेने पुढे कार्यकर्त्यांचे मनोमिलन करण्याचे मोठे आवाहन असणार आहे..काँग्रेस कडून माजी खासदार मुकुल वासनिक यांची उमेदवारी पक्की असली तरी शिवसेना पुन्हा एकदा कृपाल तुमाणे यांच्याकडेच जबाबदारी देईल का हे देखील बघणे महत्वाचे ठरणार आहे

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.