नागपूर - जिल्ह्यातील बुटीबोरी नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. १८ जागांपैकी १६ जागांवर भाजपने विजय मिळवला आहे, तर २ जागा राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत.
बुटीबोरी हा परिसर औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या परिसराचा विस्तार वेगाने होत असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी याठिकाणी लक्ष केंद्रीत केले होते. या नगरपरिषदेसाठी रविवारी मतदान झाले होते. याठिकाणी ६२ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली होती. त्यासाठी सोमवारी मतमोजणी झाली. यामध्ये भाजपने १८ पैकी १६ जागांवर विजय मिळवला, राष्ट्रवादीला २ जागा मिळाल्या आहेत. मात्र, काँग्रेसला भोपळा सुद्धा फोडता आला नाही. तसेच नगराध्यक्षपदासाठी देखील भाजपचे बबलू मनोरंजन गौतम विजयी झाले आहेत.