ETV Bharat / state

Bawankule On Sharad Pawar : पहाटेच्या शपथविधी मागे शरद पवारांचेच कारस्थान, चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप - Bawankule On Sharad Pawar

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर भारतीय जनता पक्षाकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. आजवर संपूर्ण महाराष्ट्राला माहीत होते की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये यासाठी उद्धव ठाकरे यांनी कारस्थान केले होते. आमचाही तसा समज होता. यामागे शरद पवारांचा हात होता असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

Bawankule On Sharad Pawar
Bawankule On Sharad Pawar
author img

By

Published : Jan 27, 2023, 4:02 PM IST

नागपूर : देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा शपथविधीमागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे कारस्थान असल्याचा आरोप भाजप प्रेदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. २०१९ साली देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी पहाटे शपथ घेतली होती. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार होते असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केल्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

शपथविधीमागे कट : आजवर संपूर्ण महाराष्ट्राला माहीत होते की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये यासाठी उद्धव ठाकरे यांनी षडयंत्र केले होते. आमचा ही तसा समज होता. आता जयंत पाटील यांच्याकडून वक्तव्यानंतर असा कळतंय की देवेंद्र मुख्यमंत्री न होऊ देण्यामागे शरद पवारांचे षड्यंत्र होते. पवार महाराष्ट्राताले असे नेते आहे की, ते कधीही असे कारस्थान करणार नाही. मात्र, आता जयंत पाटील यांनीच तसा दावा केल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले असल्याचं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बवनकुळे म्हणाले आहेत.

शरद पवारांनी केले कारस्थान : महाराष्ट्राच्या जनतेने भाजप, शिवसेना मतांचा कौल दिला होता. त्याला छेद देण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार यांनी षड्यंत्र केले असेच जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्या वरून दिसत आहे असे बवनकुळे म्हणाले आहेत. शरद पवार हेच या कारस्थानाचे मुख्य सूत्रधार होते, हेच दिसून येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शरद पवारांना शोभले का देवेंद्र फडणवीस यांना जनतेचा कौल मिळाला होता. त्याला कपटकारस्थान करून छेद देणे हे शरद पवार सारख्या राजकरण्याला किती शोभले असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

जयंत पाटलांच्या मनात काय : शरद पवार यांनी कुठलेही कपटकारस्थान केले नसेल, तर जयंत पाटील का शरद पवार यांना बदनाम करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयंत पाटील यांच्यावर काही अन्याय झाला आहे का. भविष्यात याचे खुलासे ही होतील असे बवनकुळे म्हणाले आहेत. त्यांच्या वक्तव्यानंतर दोनच शक्यता आहेत. एक तर शरद पवार खरोखर कट कारस्थानामध्ये होते. त्यांनी शकुनी मामाची भूमिका बजावली नसेल तर, जयंत पाटील खोटे बोलत असतील. देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री होऊ द्यायचा नव्हते तर, देवेंद्र फडणवीस यांच्या बाबी आम्हाला चालत नाहीत असे जाहीररित्या सांगायला पाहिजे. आतापर्यंत एकटे उद्धव ठाकरे आमच्या दृष्टीने षड्यंत्रकारी शकुनी मामाच्या भूमिकेत होते. मात्र, जयंत पाटील यांच्या वक्तव्यानंतर त्यात शरद पवार यांचाही सहभाग होता हे दिसून येत आहे.

पवारांनी खुलासा करावा : या संदर्भात खुलासा शरद पवार यांनी करायला हवं होता. की, त्यांना मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस का चालत नव्हते. का त्यांनी तुकडे तुकडे गॅंग गोळा केली. फक्त उद्धव ठाकरे एकटे आरोपी नाही. तर, शरद पवार हे ही त्यांच्या नजरेत आरोपी आहे.

भाजप 51 टक्के मत मिळतील : आज निवडणूका झाल्या तर, भाजप च्या 45 पेक्षा जास्त लोकसभेच्या जागा जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधानांच्या नेतृत्वात गरीब कल्याण योजना गरिबांपर्यंत पोहोचल्या आहेत. त्यामुळे आम्हाला लोकांचा कौल मिळेल.

किंचित सेना वंचित सेना : शरद पवार हे भाजपसोबत आहे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. मी यापूर्वीही म्हणालो आहे की, उद्धव ठाकरे यांची किंचित सेना आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित सेना एकत्रित आल्या आहेत. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनाच ते एकत्रीकरण मान्य नाही. त्याबद्दल महाविकास आघाडी निर्णय घेईल. मात्र, आम्हाला या युतीची चिंता नाही.

प्रकाश आंबेडकर लहान डोक्याचे : प्रकाश आंबेडकर लहान डोक्याचे आहेत. भाजपचे आदिवासींसाठी मागासवर्गीयांसाठी मोठे काम आहे. काँग्रेसने स्वतःच्या स्वार्थासाठी अनेक वेळेला बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान तोडले आहे. मात्र, भाजपने तस केले नाही. तरी प्रकाश आंबेडकर आम्हाला वैयक्तिक विरोधी म्हणून असे वक्तव्य करत आहेत.

हेही वाचा - zilla Parishad School : जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांचा अनोखा उपक्रम; दप्तरमुक्त शाळेमुळे, विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.