नागपूर - राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून सत्तास्थापन करतील, अशी शक्यता निर्माण झाली असताना शनिवारी राज्यपाल कोश्यारींनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. राज्यातल्या या राजकीय उलथापालथी नंतर मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे.
हेही वाचा - सत्ता समीकरण बदलले, अजित पवारांचे बंड की शरद पवारांचा गेम?
यावेळी फटके फोडून आणि मिठाई वाटून मध्य नागपूरच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्या बद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिवसेनेने जनादेशाचा अपमान केला. शेतकऱ्यांची स्थिती बघता भाजप आणि राष्ट्रवादीने घेतलेला निर्णय योग्य असून ५ वर्ष पूर्ण वेळ हे सरकार चालेल, असा विश्वास नागपूर शहर अध्यक्षांनी व्यक्त केला आहे.