ETV Bharat / state

BJP MLA Cheating Case : मंत्रिपदाचे गाजर देऊन भाजप आमदारांची फसवणूक प्रकरण, ऑडिओ कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

भारतीय जनता पक्षाच्या चार आमदारांना एका भामट्याने आवडत्या मंत्रिपदाचे गाजर दाखवत लाखो रुपये उकळल्याचा खुलासा झाल्यानंतर एकचं खळबळ माजली आहे. पैसे द्या तुम्हाला मंत्रिपद मिळेल अशी बतावणी त्या भामट्याने केली होती. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे सहायक असल्याचे सांगून पैसे उकळले आहेत.

BJP MLA Cheating Case
BJP MLA Cheating Case
author img

By

Published : May 17, 2023, 7:55 PM IST

Updated : May 17, 2023, 11:06 PM IST

ऑडिओ कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

नागपूर : आरोपीने आमदार विकास कुंभारे यांना आरोपीने अनेकदा फोनवरून संपर्क साधला. त्या फोन कॉल रेकॉर्डिंग वायरल झाली आहे. ज्यात आरोपीने मंत्रिपदाच्या बदल्यात गुजरात येथे सुरू असलेल्या संघ शिक्षा वर्गासाठी पैसे मागितले तर, कधी कर्नाटक निवडणूकीत जोड-तोड करण्यासाठी पैसे लागतील, त्यासाठी तैयार राहण्याचे निर्देश देण्यात आले होते.

नड्डाचा आवाज काढात केली फसवणूक : आरोपीने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्यासह सहायक असल्याची बतावणी करत भाजपचे आमदार विकास कुंभारे यांच्यासह अनेकांना गंडविण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर, आरोपीने एकदा जे.पी नड्डा यांचा आवाज काढत आमदारांना फसवण्याचा प्रयत्न केला.

अशी केली फसवणूक : विकास कुंभारे यांना सुमारे दोन आठवड्यांपूर्वी नीरज सिंह राठोड याचा फोन आला. त्याने जे. पी. नड्डा यांचे सहायक असल्याचे सांगत एका कार्यक्रमासाठी सहकार्य हवे आहे असे म्हटले. त्यानंतर तुमचे नाव मंत्रिपदासाठी सुरू असून तुम्हाला मोठे जबाबदारी देण्यात येईल असे सांगितले. त्यानंतर त्याने सुरुवातीला एक लाख 66 हजार, नंतर आणखी लागले तर पैसे देण्यासाठी तयार राहा, असे सांगितले. त्यानंतर त्याने तीन ते चार वेळा आमदार कुंभारे यांना फोन केला. मात्र, राज्यात कधी मंत्रीपदाबाबत विचारणा झाली नसताना अचानक दिल्लीहून अशी विचारणा होते, पैसे मागितले जात असल्याने कुंभारे यांना संशय आला. त्यांनी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना विचारणा केल्यावर असे काहीच नसल्याचे स्पष्ट झाले.

पैसे तयार ठेवा गुड न्यूज मिळेल : आमदार विकास कुंभारे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांच्या कानावर हा प्रकार टाकला. त्यानंतर तहसील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत नीरज सिंह राठोडला गुजरात मध्ये जाऊन अटक केली. त्याला आज नागपुरात आणण्यात येणार आहे. नीरज राठोडने आमदार कुंभारे, आमदार टेकचंद सावरकर या दोन नागपूरच्या भाजप आमदारांना फोन करून मंत्रिपदाच्या बदल्यात पक्ष निधीसाठी पैसे द्यावे लागतील असे म्हटले. त्याने पैसे ट्रान्सफर करण्यासाठी चक्क एक लिंक देखील पाठवली होती. बडोदा येथे संघाच्या कार्यक्रमासाठी व्यवस्था केली, तर गुड न्यूज मिळेल असे देखील त्याने सांगितले होते.

आरोपीला अटक,नागपुरात आणले : मंत्रिपदाचे आमिष दाखवून भाजप आमदारांना फसवणार आरोपी नीरज सिंह राठोडला नागपूर पोलिसांनी गुजरात येथून अटक केली असून त्याला आज नागपुरात आणण्यात येत आहे.

  • वाचा -
  1. Narendra Modi To Visit Japan : पंतप्रधान नरेंद्र मोदी शिखर परिषदेसाठी जपान, ऑस्ट्रेलियासह जाणार चार देशांच्या दौऱ्यावर
  2. Karnataka CM : दिल्लीत घडामोडींना वेग, सिद्धरामय्या-शिवकुमार खरगेंना भेटले
  3. PM Narendra Modi On Rozgar Mela : सरकारचे प्रत्येक धोरण रोजगार निर्मितीचे दार उघडणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Last Updated : May 17, 2023, 11:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.