ETV Bharat / state

अंधेर नगरी, चौपट राजा; सत्तेची मस्ती, कौरवी-तालिबानी प्रवृत्ती- सुधीर मुनगंटीवार - उद्धव ठाकरे

'अंधेर नगरी चौपट राजा अशा पद्धतीने सर्व सुरू आहे. लोकशाहीत जनता अशा लोकांना धडा शिकवेल', असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar
author img

By

Published : Aug 26, 2021, 11:00 AM IST

नागपूर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करून सेनेने संविधानाचा अपमान करत स्वार्थाचे राजकारण केल्याची टीका भाजप नेते सुधीर मुंगटीवार यांनी केली. ते नागपुरात बोलत होते. 'अंधेर नगरी चौपट राजा अशा पद्धतीने सर्व सुरू आहे. लोकशाहीत जनता अशा लोकांना धडा शिकवेल', असेही मुनगंटीवार म्हणाले.

सुधीर मुनगंटीवार

'शिवसेनेवर गुन्हा दाखल करण्यासाठी भाजप तक्रार करेल असा कुठलाही विचार भारतीय जनता पक्षाचा नाही. जी चूक सत्ताधारी पक्ष शिवसेनेने केली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करून स्वतःचे स्वार्थी राजकारण दाखवण्याचे काम सेनेने केले. ज्या पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा अपमान केला. लोकशाहीत त्या पक्षाला जनता धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही', असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.

'सत्तेची मस्ती, कौरवी-तालिबानी प्रवृत्ती'

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जे वक्तव्य केले. हा अदखलपात्र गुन्हा असेल, तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोरोना व्हायरस कोंबण्याचे वक्तव्य गुन्हा नाही? राज्यपाला यांना निर्लज्ज म्हणणे हा गुन्हा नाही? खासदार उदयनराजे हे छत्रपतीचे वंशज आहेत, यावर शंका वाटते हा गुन्हा नाही? आमदार लाड यांनी चुकीचे वक्तव्य केले ते मागे घेतले असताना त्यांना जोडे मारा म्हणणे हा गुन्हा नाही का? अशी अनेक उदाहरण देत मुनगंटीवार यांनी शिवसेनेच्या वक्तव्याची आठवण करून दिली. यासोबत त्यांनी 'अंधेर नगरी चौपट राजा, विनाशकाली विपरीत बुध्दी' अशा शब्दात टीका केली. 'ही सत्तेची मस्ती आहे. तालिबानी प्रवृत्ती आहे. कौरवी वृत्ती आहे. याला जनता धडा शिकवेल' असेही मुनगंटीवार म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी मोठ्या मनाने केंद्रीय मंत्र्यांच्या अटकेची कारवाई करावी- मुनगंटीवार

सेनेसोबत भाजपची युती होईल? का यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, की 'युती सध्यातरी विषय नाही. अशी कशी होणार? कार्यकर्त्यांनी ती युती कशी मान्य असले? असेही ते म्हणाले. सर्व कार्यकर्ते काही पद मागत नाहीत आणि सर्व कार्यकर्ते आमदार खासदार होत नाही. यामुळे कार्यकर्त्यांना भावना आहेत. अन्याय करणाऱ्या पक्षासोबत कसे जाणार? यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठे मन करून ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी आयपीएस असताना कायद्याची माहिती नसल्याप्रमाणे कारवाई केली. त्यांना ताबडतोब निलंबित करून चौकशी करावी आणि विभागीय चौकशी करावी, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

हेही वाचा - नारायण राणेंचा शिरच्छेद करणाऱ्याला 51 लाखांचे बक्षिस - विश्व हिंदू सेना अध्यक्ष अरूण पाठक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.