नागपूर - इंपेरिकल डेटा तयार करण्यासाठी लागणारे 435 कोटीच्या प्रस्तावाला कॅबिनेट पुढे ठेवून मंजुरी का दिली जात नाही, असा सवाल माजी ऊर्जामंत्री तथा भाजपनेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते. राज्य मागासवर्गीय आयोगाने इंपेरिक डेटा तयार करण्यासाठी मनुष्यबळ व 435 कोटीची मागणी केली आहे. यावर बावनकुळे बोलत होते.
केंद्रसरकारने ओबीसी आरक्षनाचे संपूर्ण अधिकारी राज्याला दिले आहे. यात दुसरीकडे ओबीसीचा इंपेरिकल डेटा तयार करण्यासाठी राज्य मागसवर्गीय आयोग तयार करण्यात आला आहे. हा डेटा तयार करण्यासाठी आयोगाने राज्य सरकारला मन्यूष्यबळ द्यावे तसेच 435 कोटी रुपये देण्याची मागणी 28 जुलैला करण्यात आली. पण, यात राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुख्य सचिवांची बैठक घ्यावी, असे म्हटले आहे. पण, अजूनही राज्याच्या सचिवांना याबाबत बैठक घेण्यासाठी वेळ मिळाला नाही. यासोबतच बुधवारी (दि. 11 ऑगस्ट) झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत हा विषय जाणीवपुर्वक घेण्यात आला नाही, असाही आरोप त्यांनी केला.
यात जोपर्यंत राज्याचे मुख्य सचिव हा विषय कॅबिनेटच्या बैठकीत मांडत नाही. त्या बैठकीत 435 कोटीच्या प्रस्तावाला मंजुरी देत नाही. तोपर्यंत पैसे वाटप केले जाणार नाही आणि हा डेटा तयार करण्याचा कामाला गती येणार नाही. मुख्य सचिव या हा ओबीसीचा महत्वाचा प्रश्नाचे गांभीर्य नाही का, की बैठक घेऊ नये यासाठी मुख्य सचिवावर कोणाचा दबाव आहे, असा सवाल भाजप नेते बावनकुळे यांनी उपस्थित केला. जर दबाव नसेल तर मनयुष्यबळ उपलब्ध करून देत 435 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
'त्या' युवा संशोधकांच्या कुटुंबियांना 50 लाख देण्याची मागणी
यवतमाळ येथील 28 वर्षीय युवा संशोधक मुन्ना उर्फ शेख इस्माईल याचा मृत्यू झाला. यात त्याने एका चारचाकी मोटारीच्या इंजिनचा वापर करुन हेलिकॉप्टर तयार केले होते. 15 ऑगस्टला पेटंटसाठी प्रयत्न करणार होता. मात्र, दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. यामुळे त्या कुटुंबातील आधार निघून गेला. मागील दोन वर्षांपासून सर्व काही सोडून हे संशोधन करत असताना ही घटना घडली. यामुळे या कुटुंबाला राज्य सरकारने अद्याप मदत जाहीर केली नाही. त्या कुटुंबाला तात्काळ 50 लाख द्यावे, अशी मागणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
तांदूळ घोटाळ्याची सीबीआय चौकशी व्हावी
भंडारा व गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान घोटाळा झाला आहे. यात नागपूर जिल्ह्यात रेशनच्या तांदळाचा घोटाळा सुरू आहे. याकडे सरकारचे तथा वरिष्ठ अधिकाऱ्याचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. यामध्ये नेत्यांना अधिकाऱ्यांना माहीत आहे अनेक लोकांचा यात सहभागी असल्याचा आरोपही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. यात सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. मराठा आरक्षणात आता राज्य सरकारला कारवाई करायची आहे, असे म्हणत राज्यांना प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे पण तसे करता केंद्राकडे बोट दाखवून 50 टक्क्यांवर आरक्षणासाठी शिथिलता देण्याची मागणी करत दिशाभूल करत आहे. माजी मंत्री अशोक चव्हाण हे स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी मराठा समाजाचा वापर करायला सुरुवात केली आहे, असा आरोपही बावनकुळे यांनी केला आहे.
हेही वाचा- विवाहित महिलेच्या अंगावर प्रेमपत्र फेकणे हा विनयभंगाचा गुन्हा, नागपूर खंडपीठाचा निर्णय