ETV Bharat / state

विविध पक्षांच्या स्टार कॅम्पेनरची नागपूरसह विदर्भात मांदियाळी - नागपूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदर्भात भाजपच्या प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर आता प्रचाराची गती वाढली आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भात पुढील काही दिवसात राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह विविध पक्षाच्या मोठ्या नेत्यांच्या सभा आणि रोड शो होणार आहेत.

राहुल गांधी, प्रियांका गांधी
author img

By

Published : Apr 3, 2019, 6:21 PM IST

नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदर्भात भाजपच्या प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर आता प्रचाराची गती वाढली आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भात पुढील काही दिवसात राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह विविध पक्षाच्या मोठ्या नेत्यांच्या सभा आणि रोड शो होणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे दहा दिवस शिल्लक राहिले असल्याने प्रचार करण्याकरिता फारच कमी दिवस शिल्लक आहेत. कमी वेळेत सर्वाधिक मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी राजकीय पक्षांतर्फे जाहीर सभांचे आयोजन केले जात आहे, तर काही उमेदवार थेट मतदारांच्या भेटी-गाठी घेऊन मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्व उठा-ठेवीत जाहीर सभा प्रचाराचे प्रभावी माध्यम असल्याने नागपूरसह विदर्भात जाहीर सभांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येत आहे.

वर्धा येथील पंतप्रधान मोदींच्या सभेसोबतच प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांची देखील चंद्रपूर, नागपूर आणि अमरावतीत जाहीर सभा झाल्या आहेत. या शिवाय काँगेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे देखील विदर्भात प्रचाराच्या मोहिमेत सक्रिय झाले आहेत. राष्ट्रवादीकडूनही काही स्टार प्रचारक विदर्भात काँग्रेस उमेदवारांचे मत मागताना दिसतील. सध्या राहुल गांधी यांचा दौरा निश्चित झाला असून ते गुरुवारी नागपुरात जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर त्यांची विदर्भाच्या इतर जिल्ह्यातही सभा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. राहुल आणि प्रियांका यांच्या दौऱ्यानंतर विदर्भात काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह नक्कीच वाढणार आहे.

Intro:प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विदर्भात भाजपच्या प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर आता प्रचाराची गती वाढलेली आहे.....भाजपचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भात पुढिल काही दिवसात राहुल गांधी,प्रियांका गांधी यांच्यासह विविध पक्षाच्या मोठ्या नेत्यांच्या सभा आणि रोड शो होणार आहेत

Body:लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे दहा दिवस शिल्लक राहिले असल्याने प्रचार करण्याकरिता फारच कमी दिवस शिल्लक आहेत....कमी वेळेत सर्वाधिक मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी राजकीय पक्षांतर्फे जाहीर सभांचे आयोजन केले जात आहे,तर काही उमेदवात थेट मतदारांच्या भेटी-गाठी घेऊन मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात आहे....या सर्व उठा-ठेवीत जाहीर सभा प्रचाराचे प्रभावी माध्यम असल्याने नागपूर सह विदर्भात जाहीर सभांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येत आहे....वर्धा येथील डॉमोदी यांच्या सभे सोबतच प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांची देखील चंद्रपूर,नागपूर आणि अमरावतीत जाहीर सभा झाल्या आहेत...या शिवाय काँगेस चे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे देखील विदर्भात प्रचाराच्या मोहिमेत सक्रिय झाले आहेत... भाजपचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भात पुढिल काही दिवसात राहुल गांधी,प्रियांका गांधी यांच्यासह विविध पक्षाच्या मोठ्या नेत्यांच्या सभा आणि रोड शो होणार आहेत....या शिवाय राष्ट्रवादी कडूनही काही स्टार प्रचारक विदर्भात कॉँग्रेस उमेदवारांचे मत मागताना दिसतील...सध्या राहुल गांधी यांचा दौरा निश्चित झाला असून ते गुरुवारी नागपुरात जाहीर सभेला संबोधित करणार आहेत,त्यानंतर त्यांची विदर्भाच्या इतर जिल्ह्यातही सभा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही..राहुल आणि प्रियंकाच्या दौऱ्यानंतर विदर्भात काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह नक्कीच वाढणार आहे

वरील बातमीत राहुल आणि प्रियंका गांधी यांचे फुटेज असतील तर वापरावे,काल मोदी च्या सभेचे व्हिजवल पाठवलेले आहेत धन्यवाद

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.