नागपूर : कोणी किती जागा लढवणार आणि कोण कुठं लढणार याला आज काहीचं अर्थ नाही. केवळ भारतीय जनता पक्ष महविकास आघाडी टिकू नये म्हणून रोज मिठाचा खडा टाकत आहे. पण महाराष्ट्रात भाजपचे पानिपत झाल्याशिवाय राहणार नाही. कर्नाटकपेक्षा वाईट अवस्था भाजपची महाराष्ट्रात होईल असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर भाष्य केले. पण, महाविकास आघाडीचा पोपट मेलेला नाही. भाजपच्या सत्तेची चिमणी उडून जाईल - निशाणा वडेट्टीवार
महाविकास आघडी निवडणूकीला जाईल : संजय राऊत काय म्हणाले माहीत नाही,किंवा त्यांनी म्हटलं म्हणून निर्णय झाला असे नाही. तिन्ही पक्षाचे जेष्ठ नेते बसून जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा करतील. महविकास आघाडी म्हणून निवडणुकीला जाऊ. काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांनी रामटेक मतदार संघावर दावा सांगितलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार म्हणाले की कुणाला राऊत यांनी दावा केला असला तरीही ती जागा कोणाला दिली जाईल हा निर्णय हायकामंडचं घेईल.
भाजपच्या चिमणी भुर्रर्र उडून जाईल : फडणवीस उद्धव ठाकरे यांच्यावर बोलले. पण महविकास आघाडीचा पोपट मेला नाही. भाजपच्या सत्तेची चिमणी भुर्रर्र उडून जाईल. मला माहित नाही संजय राऊत काय म्हणाले किंवा नाही. तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते बसून जागावाटपाबाबत चर्चा करणार आहेत. महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीत आम्ही सामोरे जाणार आहोत. महाविकास आघाडी होऊ नये म्हणून भाजप मिठाच्या आमच्यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करीत आहे.
18 जागा लढवून जिंकू : संजय राऊत यांनी लोकसभा निवडणुकीवर भाष्य केले आहे. आगामी लोकसभेत शिवसेनेचे ठाकरे गटाचे 19 खासदार लोकसभेत दिसणार आहेत. महाविकास आघाडीत अद्याप निवडणुकीचा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. शिवसेना 2019 मध्ये महाराष्ट्रात जिंकलेल्या 18 जागा राखणार आहे. राऊत यांनी लोकसभा जिंकलेल्या सर्व 18 जागा लढवून जिंकू असा विश्वास व्यक्त केला.
हेही वाचा -
Sanjay Raut visit to Nanded : लोकसभेत जिंकलेल्या 19 जागांवर शिवसेनेचाच उमेदवार असेल -संजय राऊत