नागपूर : आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विधान परिषदेत आले होते. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील (BJP Leader and minister Chandrakantada Patil) यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना एक पुस्तक भेट (met Former Chief Minister Uddhav Thackeray) दिले. चंद्रकांतदादा पाटील आणि उद्धव ठाकरे यांची भेट ही पूर्वनियोजित होती की नाही?, याबद्दल खुलासा झालेला नाही. मात्र, या दोन नेत्यांच्या भेटीमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबतचं राजकीय पंडितांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत. Chandrakant Patil Met Uddhav Thackeray
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी 'फुले आंबेडकरांनी भीक मागून शाळा सुरू केल्या' असे विधान केले होते. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. याबद्दल विरोधी पक्षांनीही चंद्रकांत पाटील यांच्यावर संताप व्यक्त केला होता.
मात्र चंद्रकांत पाटील यांनी नागपुर अधिवेशनादरम्यान 'भीक मागितली' हा शब्द प्रबोधनकार ठाकरेंचाच असल्याचा पुरावा उद्धव ठाकरेंना दिला आहे. त्यांनी उध्दव ठाकरेंना प्रबोधनकारांचे एक पुस्तक दाखवले आहे. या घटनेची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
महापुरुषांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्यावर चौफेर टीका केली जात होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनीही शाळा सुरु केल्या. त्यांनी शाळा सुरु करताना सरकारने अनुदान दिलं नाही तर, त्यांनी लोकांकडे भीक मागितली, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यानंतर राज्यभरात त्यांच्यावर टीका केली जात होती. याप्रकरणी त्यांच्यावर शाईफेकही करण्यात आली होती. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी जाहीर माफीदेखील मागितली होती.
तेव्हा चंद्रकांत पाटील यांनी नागपुर अधिवेशनादरम्यान 'भीक मागितली' हा शब्द प्रबोधनकार ठाकरेंचाच असल्याचा पुरावा उद्धव ठाकरेंना दिला आहे. याभेटी दरम्यान विधानपरिषद उपसभापती नीलम गोर्हे, भाजप नेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड उपस्थित होते. Chandrakant Patil Met Uddhav Thackeray